मुंबई, 9 एप्रिल- झी मराठीवरील ( zee marathi) किचन कल्लाकार ( Kitchen Kallakar latest episode ) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. या मंचावर( Masaledar Kitchen Kallakar) आतापर्यंत विविध क्षेत्रातील व्यक्तींनी हजेरी लावली आहे. नुकताच या शोमध्ये राजकीय धुरळा पाहायला मिळाला. किचन कल्लाकारच्या मंचावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर( kishoritai pednekar) , राजकीय क्षेत्रातील आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ( chitratai wagh ) आणि रुपाली ठोंबरे (rupalitai thombre) यांनी हजेरी लावली होती. आता यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादीचे (NCP ) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse ) आणि भाजप (BJP ) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya )देखील हजेरी लावणार आहेत. त्यांचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे.
झी मराठीनं नुकताच किचन कल्लाकारचा एक प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी किचन कल्लाकारच्या मंचावर हजेरी लावल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे राजकीय मैदानात नेहमी एकमेकांवर आरोप करणारे हे चेहरे या मंचावर मात्र एकमेकांची कडकडून गळाभेट घेताना दिसले. राजकीय मैदानातील हे शत्रू या शोच्या माध्यमातून एकत्र आले व यानिमित्त त्यांनी किचनमध्ये जोरदार कल्ला केला.
वाचा-'चंद्रमुखी' साठी प्रसादनं अमृताकडून करून घेतली 'ही' गोष्ट ;म्हणते, नथीवरचं रक्त
झी मराठीनं हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, एकनाथ खडसे आणि किरीट सोमय्या ही नेतेमंडळी किचनमध्ये बनणार कल्लाकार. यावेळी शोमध्ये काही खेळ खेळण्यात आले. एकनाथ खडसे यांना काही राजकीय क्षेत्रातील नेत्यांचे फोटो दाखण्यात आले. त्यापैकी एक फोटो शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा होता. त्यांना विचारण्यात आलं यांना पाहून तुम्हाल कोणतं गाणं आठवतं? यावर एकनाथ खडसे यांनी देखील भन्नाट उत्तर दिले. ते म्हणाले की, आ देखे जरा...किसमे कितना है दम....त्यांच्या या उत्तरावर किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया मात्र लक्षवेधी होती. ते म्हणाले की, आता तर सफाईला सुरूवात केली आहे.. त्यामुळे या शोच्या निमित्ताने राजकीय नेत्यांची मसालेदार रेसिपी पाहिला नाही मिळाली तर मसालेदार चर्चा मात्र अनुभवता येणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील ही राजकीय खिचडी पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
View this post on Instagram
आजपर्यंत या किचनमध्ये कलाकारांचा कल्ला पाहायला मिळाला. पण आता राजकीय नेत्यांचा कल्ला या शोमध्ये पाहण्यास मिळत आहे. नेहमी राजकीय पटलवार खिचडी शिजवणारे आता या मंचावर खिचडी कशी शिजवतात हे पाहता येणार आहे. यापूर्वी या शोमध्ये राष्ट्रवादी नेते रोहित पवार, भाजप नेत्या पंकजा मुंडे, कॉग्रेस नेत्या प्रणिती शिंदे, सुजय विखे- पाटील, अमृता फडणवीस यांनी देखील हजेरी लावली आहे.
वाचा-‘तुझेच मी गीत गात आहे’मधील छोट्या स्वराबद्दलच्या या गोष्टी माहिती आहेत का?
महाराष्ट्राच्या राजकारणाचे एक वैशिष्टय राहिले आहे. ते म्हणजे कोण किती जरी शत्रू असला तरी सार्वजनिक ठिकाणी असेल किंवा सुख दु: खात हे नेते मंडळी सर्व विसरून एकत्र येताना दिसतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Eknath khadse, Entertainment, Kirit Somaiya, Marathi entertainment, Sanjay raut, Zee marathi serial