मुंबई 13 जुलै: पावसाळा म्हटलं की आपल्याला आठवते ती गरमागरम कांदाभजी आणि बटाटे वडे. (Batata Vada & Kandha Bhaji) सध्या राज्यात पावसाचं पुनरागमन झालं आहे. त्यामुळे सेलिब्रिटी या पावसाचा आनंद घेत असतानाचे व्हिडीओज सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. असाच एक व्हिडीओ मराठी अभिनेत्री किशोरी शहाणे (Kishori Shahane) यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या आपल्या पतीसोबत गरमागरम कांदाभजी आणि बटाटे वडे यांचा आनंद घेताना दिसत आहे. (Kishori Shahane Video Viral)
किशोरी शहाणे यांनी हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. “पावसाळ्यात हा परफेक्ट नाश्ता आहे. मी माझ्या पतीसोबत कांदाभजी आणि बटाटा वड्याचा आनंद घेतेय.” अशा आशयाची कमेंट त्यांनी यावर केली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
आलिया-रणबीरचा 2037 मध्ये होणार घटस्फोट; अभिनेत्याची वादग्रस्त भविष्यवाणी चर्चेत
View this post on Instagram
‘राजकीय नाटकं चालतात पण आमची नाही’; केदार शिंदेंचा राज्य सरकारला टोला
मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये दर्जेदार भूमिकांमुळं किशोरी शहाणे यांनी चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलंय. अनेक वर्षे मराठी चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर त्या छोट्या पडद्याकडं वळल्या. लाइफ ओकेच्या 'नागार्जुन-एक योद्धा' या मालिकेत त्यांनी मनसा देवी या नागदेवतेची भूमिकाही साकारली होती. किशोरी शहाणे यांनी मराठी आणि हिंदीच नव्हे तर हॉलिवूडच्या सिनेमातही काम केलंय. दिग्दर्शक ड्यूएन अॅडलेरच्या 'मेक युवर मूव्ह' या हॉलिवूडपटात काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Marathi actress, Video viral