04 एप्रिल : गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
काल रात्री प्रभादेवीतील राहत्या घरी रात्री अकराच्या सुमारास किशोरीताईंचं झोपेतच निधन झालं. आज सकाळी त्यांचं पार्थिव रवींद्र नाट्यमंदिर संकुलात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. ज्येष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता, गायिका आरती अंकलीकर, श्रीधर फडके, अभिनेत्री भारती आचरेकर आदी मान्यवरांनी त्यांचं अत्यंदर्शन घेऊन आदरांजली वाहिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केली. संध्याकाळी दादर चौपाटी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा