Home /News /entertainment /

‘लग्नामुळं मी पिंजऱ्यात कैद झाले’; किर्ती कुल्हारीनं सांगितलं घटस्फोटाचं कारण

‘लग्नामुळं मी पिंजऱ्यात कैद झाले’; किर्ती कुल्हारीनं सांगितलं घटस्फोटाचं कारण

प्रेम विवाह करुन देखील तिचं नातं दिर्घ काळ टिकलं नाही. (Kirti Kulhari talks about her divorce) आणि लग्नानंतर अल्पावधीतच तिला घटस्फोट घ्यावा लागला.

    मुंबई 26 जून: किर्ती कुल्हारी (Kirti Kulhari) ही एक प्रयोगशील अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिनं आजवर पत्नी, प्रेयसी, क्रांतीकारक, खलनायिका अशा विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. वेब सीरिज असो की चित्रपट दोन्ही माध्यमात तिनं आपल्या अनोख्या अभिनयशैलीद्वारे अक्षरश: धुमाकूळ घातला. तिनं कुटुंबीयांचा पाठिंबा नसताना देखील बॉलिवूडमध्ये स्वत:चं असं एक वेगळं स्थान निर्माण केलं. परंतु करिअरमध्ये अफाट यश मिळवणारी किर्ती वैयक्तिक आयुष्यात मात्र काहीशी मागे पडली. प्रेम विवाह करुन देखील तिचं नातं दिर्घ काळ टिकलं नाही. (Kirti Kulhari talks about her divorce) आणि लग्नानंतर अल्पावधीतच तिला घटस्फोट घ्यावा लागला. ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत किर्तीनं आपल्या वैवाहिक आयुष्यावर भाष्य केलं. तिनं आपलं लग्न टिकवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ते टिकू शकलं नाही असा अनुभव तिनं सांगितला. किर्तीनं अभिनेता साहिल सहगलसोबत (Saahil Sehgal) लग्न केलं होतं. लग्नापूर्वी बराच काळ त्यांनी एकमेकांना डेट केलं. परंतु लग्नानंतर त्यांच्यातील संबंध बिघडले. अंतर्गत मतभेद वाढले. अन् एक दिवस त्यांनी घटस्फोट घेतला. ‘तू वेश्या व्यवसाय करतेस का?’ पॉर्नस्टार म्हणून ट्रोल करणाऱ्याला सोफिया हयातचं प्रत्युत्तर किर्ती म्हणाली, “माझ्या करिअरमध्ये साहिलचा खूप मोठा वाटा आहे. त्यानं कायमच तिला प्रोत्साहित केलं. तो मित्र म्हणून खूप चांगला आहे. पण कदाचित पती म्हणून त्याला त्याची कर्तव्य कळली नाहीत. मी हे नातं टिकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण ते टिकवू शकले नाही. कारण प्रयत्न दोन्ही बाजूनं होणं अपेक्षित होतं. लग्नामुळं मी जणू एखाद्या पिंजऱ्यात कैद झाले होते. पण आता त्या पिंजऱ्यातून मुक्त झाल्याची जाणिव होते. आईला माझा निर्णय आवडला नाही. पण बाबांना माझी अवस्था कळली. त्यांनी मला या निर्णयात पाठिंबा दिला.”
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Bollywood actress, Divorce, Entertainment

    पुढील बातम्या