मुंबई, 21 मार्च : भारतात करोनानाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. अनेक लोक पुन्हा एकदा करोनाच्या तावडीत सापडत आहेत. तसेच येत्या काळात रुग्णांची संख्या वाढू शकते असेही सांगितले जात आहे. अशातच आता बॉलिवूड जगतातून मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेत्री आणि राजकारणी किरण खेर यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. किरण यांनी ट्विटरवर यासंबंधीची माहिती दिली आहे.
किरण खेर यांनी ट्विटरवर ट्विट करत लिहिलंय कि, 'माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी कृपया स्वतःची चाचणी करून घ्या.' त्यांच्या या ट्विटनंतर चाहते त्यांना काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत. किरण खेर सध्या राहत्या घरी आराम करत आहेत.
2021 मध्ये, किरण खेर यांना मल्टिपल मायलोमा म्हणजेच रक्ताचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते. ही बातमी त्यांचे पती आणि अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर दिली होती. या आजारावर योग्य ते उपचार घेऊन त्या लवकरच बऱ्या झाल्या होत्या. पडद्यापासून एक वर्ष दूर राहिल्यानंतर त्यांनी गेल्या वर्षी 'इंडियाज गॉट टॅलेंट' या रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून पुनरागमन केले होते. त्यांना पुन्हा पडद्यावर पहिल्यांनंतर चाहते चांगलेच खुश झाले होते. पण आता त्यांना करोनाची लागण झाल्याची बातमी समोर आल्यानंतर चाहते पुन्हा एकदा चिंतेत पडले आहेत.
I have tested positive for Covid. So anyone who has come in contact with me please get yourself tested.
— Kirron Kher (@KirronKherBJP) March 20, 2023
अनेकांच्या आवडत्या, किरण यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये उल्लेखनीय काम केले आहे. किरण यांनी बॉलिवूडच्या अनेक हिट चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारली. त्यातही 'देवदास', 'रंग दे बसंती', 'हम तुम', 'दोस्ताना', 'मैं हूं ना' आणि यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांनी सर्वाधिक लोकप्रियता मिळवली.त्यानंतर त्या छोट्या पडद्यावरील वेगवेगळ्या रिऍलिटी शो जज म्हणून काम केलं आहे.
१९८५ मध्ये अभिनेता अनुपम खेर यांच्याशी लग्न केले. त्यांचे आधी गौतम बेरीशी लग्न झाले होते आणि १९८१ मध्ये सिकंदर खेर हा पहिल्या लग्नापासून त्यांना मुलगाही होता. दरम्यान, अनुपम यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ते 'द व्हॅक्सिन वॉर' आणि 'इमर्जन्सी'मध्ये दिसणार आहेत. किरण हे भारतातील सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. आता किरण खेर लवकरच या आजारातून बाहेर पडाव्या अशी प्रार्थना चाहते करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Entertainment