Home /News /entertainment /

कराच्या पैशांना म्हणाल्या दान; 1 कोटींची मदत करुनही किरण खेर होतायेत ट्रोल

कराच्या पैशांना म्हणाल्या दान; 1 कोटींची मदत करुनही किरण खेर होतायेत ट्रोल

‘लोकांचे पैसे लोकांना देता अन् दान दिलं सांगून प्रसिद्धी मिळवता’; किरण खेर यांच्यावर होतेय जोरदार टीका

    मुंबई 28 एप्रिल: कोरोना विषाणूच्या (coronavirus) वाढत्या संक्रमणामुळं सध्या देशभरातील लोक त्रस्त आहे. लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक लोक बेरोजगार झाले आहेत. रुग्णालयांमध्ये उचारासाठी जागा नाहीये इतकी भीषण परिस्थिती उद्भवली आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत अनेक सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला. यामध्ये अभिनेत्री किरण खेर (Kirron Kher) देखील होत्या. त्यांनी एक कोटी रुपयांची मदत जाहिर केली. परंतु त्यांचा मेसेज पाहून नेटकरी संतापले आहेत. “लोकांचेच पैसे लोकांना दान देता अन् वरुन प्रसिद्धी देखील मिळवता” असं म्हणत त्यांना ट्रोल केलं जात आहे. अवश्य पाहा - कॉलसेंटरमध्ये काम करणारी समंथा कशी झाली कोट्यवधींची मालकीण? किरम खेर यांनी मेंबर ऑफ पार्लामेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट (MPLADS) या योजनेअंतर्गत चंदीगढसाठी एक कोटी रुपयांची मदत जाहिर केली. मी “लोकांसाठी प्रार्थना करतेय. आशा आहे परिस्थिती लवकरच पहिल्यासारखी होईल. कोणीही धीर खचू नका. मी एक कोटींचं दान करत आहे.” अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं होतं. मात्र हे ट्विट पाहून नेटकरी संतापले. कारण त्यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘दान’ हा शब्द वापरला. खरं तर किरण खेर यांनी केलेली मदत ही त्यांची वैयक्तिक नसून देशवासीयांच्या करातून गोळा होणारा पैसा आहे. तरी देखील या मदतीला त्या ‘दान’ असं म्हणत आहेत. त्यामुळं देशातील अनेक लोक त्यांच्यावर संतापले आहेत. “आमचेच पैसे आम्हाला देता अन् दान दिले म्हणून खोटं सांगता. वरुन प्रसिद्धी देखील मिळवण्याचा प्रयत्न करता.” अशा आशयाच्या प्रतिक्रिया देऊन सध्या त्यांना जोरदार ट्रोल केलं जात आहे. या ट्रोलिंगवर त्यांनी अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Bollywood actress, Entertainment, Marathi entertainment

    पुढील बातम्या