मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /किरण खेर कशा पडल्या अनुपम खेर यांच्या प्रेमात? त्या घटनेनंतर सुरू झाली लव्हस्टोरी

किरण खेर कशा पडल्या अनुपम खेर यांच्या प्रेमात? त्या घटनेनंतर सुरू झाली लव्हस्टोरी

प्रेक्षकांची मन जिंकण्यासोबतच त्यांनी कलाविश्वातील आणखी एका व्यक्तीच्या मनावर राज्य केलं. अन् ती व्यक्ती म्हणजे अभिनेता अनुपम खेर. (kirron kher anupam kher love story) आज किरण खेर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जाणून घेऊया त्यांच्या अनोख्या लव्हस्टोरी विषयी...

पुढे वाचा ...

मुंबई 13 जून: 1988 साली ‘पेस्तनजी’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या किरण खेर (Kirron Kher) आज बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी एक वेगळी ओळख प्रस्थापित केली. (Kirron Kher Member of the Lok Sabha) आज किरण खेर यांचा वाढदिवस आहे. 69 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Kirron Kher birthday) गेली तीन दशकं त्या सातत्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. विशेष म्हणजे प्रेक्षकांची मन जिंकण्यासोबतच त्यांनी कलाविश्वातील आणखी एका व्यक्तीच्या मनावर राज्य केलं. अन् ती व्यक्ती म्हणजे अभिनेता अनुपम खेर. (kirron kher anupam kher love story) आज किरण खेर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जाणून घेऊया त्यांच्या अनोख्या लव्हस्टोरी विषयी...

दिशा पटानी होती या अभिनेत्याच्या प्रेमात; समलैंगिकतेच्या आरोपांमुळं मोडलं लग्न

किरण आणि अनुपम खेर हे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना एकमेकांना ओळखत होते. मात्र त्यांच्यामध्ये केवळ मैत्रीचं नातं होतं. प्रेम किंवा लग्न हा विचार देखील त्यांनी केला नव्हता. पुढे अनेक वर्षानंतर एका चित्रपटाच्या निमित्तानं मुंबईत दोघांची पुन्हा एकदा भेट झाली. परंतु यावेळी दोघांचंही लग्न झालं होतं. मात्र तरी देखील दोघांमधील मैत्री वाढत गेली आणि पुढे त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अनुपम खेर यांना 1985 साली ‘सारांश’ हा पहिला चित्रपट मिळाला. यानंतर त्यांनी आपल्या पत्नीला घटस्फोट दिला. लक्षवेधी बाब म्हणजे याच काळात किरण खेर या देखील त्यांच्या पतीपासून विभक्त झाल्या होत्या. अन् दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला.

मुलाखत देताना अभिनेते दाढी का खाजवतात? सुनील ग्रोवरनं सांगितलं थक्क करणारं कारण

किरण खेर यांनी ‘देवदास’, ‘हम तुम’, ‘वीर-झारा’, ‘फना’, ‘रंग दे बसंती’, ‘कभी अलविदा ना कहना’, ‘ओम शांती ओम’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच त्यांनी राजकारणातही आपले नशीब आजमावल्याचे पाहायला मिळते.

First published:
top videos

    Tags: Anupam kher, Entertainment, Love story