अर्ध्या तासाच्या फोन कॉलमुळे किरण झाली 'मिसेस परफेक्शनिस्ट'; आमिर खानची प्यारवारी लव्हस्टोरी
निर्माती दिग्दर्शिका किरण राव(Kiran Rao)चा 47वा वाढदिवस आहे. सुपरस्टार आमिर खान(Aamir Khan) ची पत्नी असूनसुद्धा किरणने स्वत:ची एक खास ओळख निर्माण केली आहे.तिच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या लव्हस्टोरीचा एका इंटरेस्टिंग किस्सा
मुंबई, 07 नोव्हेंबर: आमिर खान (Aamir Khan)ची बायको आणि दिग्दर्शिका किरण राव (Kiran Rao)चा 47वा वाढदिवस आहे. किरण राव जानुमपल्ली असं तिचं पूर्ण नाव आहे. तेलंगणाच्या गदवाल जिल्ह्यात तिचा जन्म झाला होता. किरण रावने सोफिया कॉलेज फॉर वूमन्समधून आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर जामिया मिलिया इस्लामिया कॉलेजमधून तिने मास्टर्सची डिग्री घेतली. इंडस्ट्रीमध्ये किरण रावची स्वत:ची एक ओळख आहे. किरण राव अतिशय गुणी दिग्दर्शिका आणि निर्माती आहे.आमिर खान आणि किरणची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे.
किरणच्या आधी आमिर खानचं लग्न रीना दत्तासोबत झालं होतं. 2000 साली त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर किरण राव आणि आमिर खान यांचं लग्न झालं. केवळ एका फोनच्या संभाषणानंतर आमिर खान आणि किरण राव मनाने एकमेकांच्या जवळ आले होते. एका मुलाखतीमध्ये आमिरने सांगितलं होतं की, “2001 साली तो 'लगान' फिल्मचं काम करत होता. त्यावेळी किरण राव या फिल्मची असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होती. त्यावेळी आमची एकमेकांशी फक्त ओळख झाली होती. माझ्या घटस्फोटानंतर एकदा मी आणि किरण अर्धा तास फोनवर बोलत होतो. फोन ठेवल्यानंतर मला तिच्याशी आणखी बोलावसं वाटत होतं. या फोन कॉलनंतर आम्ही एकमेंकांना भेटायला लागलो. आणि त्यानंतर दीड वर्षांनी आम्ही लग्नाचा निर्णय घेतला.
2005 साली आमिर आणि किरणचं लग्न झालं. त्यांना आझाद नावाचा मुलगा आहे. किरण राव एक प्रतिभासंपन्न दिग्दर्शिका आणि निर्माती आहे. तिने आत्तापर्यंत सीक्रेट सुपरस्टार, पीपली लाइव्ह, दंगल, तलाश आणि जाने तू या जाने ना... या सिनेमांची निर्मिती केली आहे.