Home /News /entertainment /

'ही कोणती झुंडशाही?' मालिकेतून काढल्यानंतर किरण मानेंची पहिली प्रतिक्रिया VIDEO

'ही कोणती झुंडशाही?' मालिकेतून काढल्यानंतर किरण मानेंची पहिली प्रतिक्रिया VIDEO

'मी घरात काय खातो, मी बाहेर काय बोलतो, कपडे काय घालतो, यावर कुणीही बंधन ठेवू नये, ही लोकशाही आहे, हा काही अफगानिस्तान नाही'

'मी घरात काय खातो, मी बाहेर काय बोलतो, कपडे काय घालतो, यावर कुणीही बंधन ठेवू नये, ही लोकशाही आहे, हा काही अफगानिस्तान नाही'

'मी घरात काय खातो, मी बाहेर काय बोलतो, कपडे काय घालतो, यावर कुणीही बंधन ठेवू नये, ही लोकशाही आहे, हा काही अफगानिस्तान नाही'

सातारा, 14 जानेवारी :  राजकीय टीका करतो म्हणून स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो ( mulgi zali ho ) या लोकप्रिय मालिकेत अभिनेते किरण माने (kiran mane) यांना काढून टाकण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. सर्वच स्तरातून या प्रकाराचा निषेध होत आहे. तर, ' हे काही अफगानिस्तान नाही किंवा पाकिस्तान नाही. हा भारत आहे, तुम्ही राजकीय भूमिका मांडतात म्हणून मालिकेमधून काढून टाकले, ही कोणती झुंडशाही आहे' अशी संतप्त प्रतिक्रिया किरण माने यांनी दिली आहे. ( kiran mane removed from mulgi zali ho ) किरण माने यांना मालिकेतून काढून टाकण्यात आल्यानंतर सोशल मीडिया आणि राजकीय स्तरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणावर पहिल्यांदाच न्यूज18 लोकमतशी बोलत असताना किरण माने यांनी आपली भूमिका मांडली. 'हे मला सुद्धा धक्कादायक आहे. साधारपणे काम करत असताना, हा वेळेत काम करतोय ना, वेळेत हजर होतोय ना, प्रॉडक्शन हाऊसमध्ये काही तक्रारी आहे का, मानधन कमी घेतो का असं असेल तर समजू शकतो. अनेक वेळातर मेकअप रुममध्ये फॅन नसतो, कलाकारांना टॉयलेट सुद्धा नसतात. अशा अनेक अडचणी सहन केल्या आहे. मी माझे काम चोखपणे बजावले आहे. पण, मी जेव्हा फोन केला तेव्हा कळलं की, मी राजकीय भूमिका घेतो म्हणून मला कामावरून कमी केले आहे' असं माने यांनी सांगितलं. 'पण सोशल मीडियावर मी जे काही व्यक्त झालो तो किरण माने वेगळा आहे. राजकीय भूमिका मांडणे हे माझे व्यक्तीगत विचार आहे, तो माझे हक्क आहे. मी घरात काय खातो, मी बाहेर काय बोलतो, कपडे काय घालतो, यावर कुणीही बंधन ठेवू नये, ही लोकशाही आहे, हा काही अफगानिस्तान नाही, पाकिस्तान नाही. हा भारत आहे, असंही माने म्हणाले. (गुड न्यूज ! मुंबईत नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट) 'आपण खूप संघर्ष करून पुढे आलो आहेत, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्य घटना दिली आहे. आपल्याला काही अधिकार दिले आहे. तो भारत आहे, त्या भारतात आपण राहतो. मग तुम्ही राजकीय भूमिका मांडतात म्हणून मालिकेमधून काढून टाकले, ही कोणती झुंडशाही आहे' असा संतापही मानेंनी व्यक्त केला. 'मी जी काही राजकीय भूमिका मांडली त्यामध्ये कोणत्याही राजकीय नेत्याचे नाव घेऊन टीका केली नाही. मी पुरोगामी विचारधारा मानणारा आहे, मी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले यांचे विचार मानणारा आहे. जे शिवाजी महाराजांचे विचार तुमच्यापर्यंत येऊ देत नाही, ते मी माझ्या कलेतून मांडत असतो. त्यामुळे विरोधी विचारधारेच्या लोकांना राग येत होता ते आधीही मला ट्रोल करत होते. पण आता ते या थराला पोहोचले आहे. मला सोशल मीडियावर माझ्या कुटुंबीयांबद्दल अर्वाच्च भाषेत लिहित होते, याची रोजीरोटी थांबवा अशी धमकी देत होते, असा खुलासाही माने यांनी केला. (बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात नेमका कशामुळे झाला? COI ने काढला निष्कर्ष) तसंच, अभिनय वेगळा भाग आहे आणि ज्या पोस्ट मी करतो तो माझा विचार आहे ते विचार मांडण्याचे स्वातंत्र्य मला आहे त्यामुळे घडलेल्या प्रकाराबाबत मी शेवटच्या श्वासापर्यंत लढा देणार असल्याचेही  किरण माने यांनी यांनी ठणकावून सांगितले.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या