Home /News /entertainment /

मालिकेतून काढून टाकल्यानंतर Kiran Mane ची 'या' ऐतिहासिक चित्रपटात वर्णी, FB पोस्ट करत दिली माहिती

मालिकेतून काढून टाकल्यानंतर Kiran Mane ची 'या' ऐतिहासिक चित्रपटात वर्णी, FB पोस्ट करत दिली माहिती

Kiran Mane

Kiran Mane

'मुलगी झाली हो'(Mulgi Zali Ho) या मालिकेतून चूकीच्या वर्तणुकीच्या कारणामुळे अभिनेते किरण माने (Kiran Mane ) यांना काढण्यात आले. मालिकेतून काढल्यानंतर 'रावरंभा'(ravrambha) या चित्रपटासाठी विचारणा झाली असून सध्या किरण माने या चित्रपटासाठी चित्रीकरण करत आहेत.

पुढे वाचा ...
    मुंबई, 20 जानेवारी: स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' (Mulgi Zali Ho)या मालिकेतून चूकीच्या वर्तणुकीचे कारण देत अभिनेते किरण माने (Kiran Mane ) यांना काढण्यात आलं. त्यावरुन मराठी सिनेसृष्टीत चांगलेच वादंग पेटले आहे. अनेक फेसबुक पोस्ट करत किरण माने यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. झालेल्या प्रत्येक आरोपवर त्यांनी स्पष्टीकरण देत तथ्य काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न दिला. दरम्यान, नुकतीच किरण माने यांनी नवी फेसबुक पोस्ट करत मालिकेतून काढल्यानंतर 'रावरंभा' (ravrambha )या चित्रपटासाठी विचारणा झाली असून सध्या याचे चित्रीकरण सुरु असल्याचा माहिती दिली आहे. रावरंभा या चित्रपटातून ऐतिहासिक प्रेमकहाणी समोर येणार आहे. या चित्रपटात अनेक कलाकार झळकणार असून आता त्यात किरण माने यांचीही वर्णी लागली आहे. यासंदर्भात त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. 'आनंद वो...निव्वळ आनंद... नविन भन्नाट जबराट नादखुळा भुमिका ! सोबत प्रतिभावानांची टीम !! पन वास्तवात ज्या विचारधारेची 'भुमिका' घेत असतो...लढत असतो..त्याचवेळी मोठ्या पडद्यावरबी त्याच विचाराचा धागा असनारी 'भुमिका' मिळावी, यासारखं दूसरं समाधान नाय भावांनो !!!' अशी भावना व्यक्त करत त्यांनी आपल्या नव्या भूमिकेबद्दल मत व्यक्त केले आहे. नेमकं किरण मानेंसोबत काय घडलं? अभिनेते किरण माने यांना 'मुलगी झाली हो' या मालिकेतून तडकाफडकी काढण्यात आलं होतं. त्यांनतर त्यांनी आपण राजकीय भूमिका मांडली म्हणून आपल्याला काहीही पूर्व सूचना न देता मालिकेत काढून टाकण्यात आल्याचा आरोप निर्मात्यांवर केला होता. त्यांनतर पत्रक जाहीर करत वाहिनीने किरण माने गैरवर्तवणूक करत होते वारंवार सांगूनही त्यांच्या वागण्यात बदल झाला नाही त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं होतं. या दोन्ही बाजूने होत असलेल्या आरोप प्रत्यारोपाने हे प्रकरण चांगलंच तापलं आहे. यामध्ये अनेक कलाकारांनी उद्या घेतल्या आहेत. काहींनी किरण माने यांच्या समर्थनात तर काहींनी विरोधात भूमिका मांडली आहे.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Marathi entertainment

    पुढील बातम्या