Home /News /entertainment /

Kiran Mane: 'तुझीबी कायतरी मजबूरी आसंल गं..' किरण माने यांची नवी पोस्ट चर्चेत

Kiran Mane: 'तुझीबी कायतरी मजबूरी आसंल गं..' किरण माने यांची नवी पोस्ट चर्चेत

किरण माने यांनी सेटवरील एका खास व्यक्तीसाठी एक लक्षवेधी पोस्ट लिहिली आहे. पाहूया काय आहे ती पोस्ट..

    मुंबई, 19 जानेवारी-   किरण माने   (Kiran Mane)  हे प्रकरण आता चांगलंच तापलेलं दिसत आहे. वाहिनीने स्पष्टीकरण दिल्या नंतर प्रकरणाला वेगळं वळण लागताना दिसत होतं. 'मुलगी झाली हो'   (Mulgi Zali Ho)   मालिकेच्या सेटवर दोन गट पडलेले दिसून येत आहेत. यामध्ये काही कलाकार मानेंना पाठिंबा देत आहेत. तर काही त्यांच्या विरोधात उभे आहेत. दरम्यान किरण माने यांनी सेटवरील एका खास व्यक्तीसाठी एक लक्षवेधी पोस्ट लिहिली आहे. पाहूया काय आहे ती पोस्ट.. अभिनेते किरण माने यांना 'मुलगी झाली हो' या मालिकेतून तडकाफडकी काढण्यात आलं होतं. त्यांनतर त्यांनी आपण राजकीय भूमिका मांडली म्हणून आपल्याला काहीही पूर्व सूचना न देता मालिकेत काढून टाकण्यात आल्याचा आरोप निर्मात्यांवर केला होता. त्यांनतर पत्रक जाहीर करत वाहिनीने किरण माने गैरवर्तवणूक करत होते वारंवार सांगूनही त्यांच्या वागण्यात बदल झाला नाही त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं होतं. या दोन्ही बाजूने होत असलेल्या आरोप प्रत्यारोपाने हे प्रकरण चांगलंच तापलं आहे. यामध्ये अनेक कलाकारांनी उद्या घेतल्या आहेत. काहींनी किरण माने यांच्या समर्थनात तर काहींनी विरोधात भूमिका मांडली आहे. अशातच आता किरण माने यांनी आपल्या विरोधात भूमिका मांडणाऱ्या आपल्या एका सहकलाकाराबद्दल खास पोस्ट लिहिली आहे. किरण माने यांची पोस्ट- किरण माने यांनी मालिकेतील आपल्या सहकलाकार असणाऱ्या अभिनेत्री सविता मालपेकर यांच्यासाठी ही पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे, " मी लाडानं तुला 'म्हातारे' अशी हाक मारायचो... अगदी परवा-परवा शेवटच्या दिसापर्यन्त ! तू बी माझ्याशी लै प्रेमानं वागत हुतीस.. आपल्या शुटिंगच्या शेवटच्या दिसापर्यन्त !! अलीकडच्या दिवसांत कुनीतरी तुझे माझ्याबद्दल गैरसमज करून दिलेवते... "किरण लेखकांना सांगून तुझा पत्ता कट करतोय." असं तुला वाटायला लागलं... तू मेकअपरुमध्ये बसून मला लै जोरजोरात शिव्या देत हुतीस... तवाबी मी तुझ्याशी भांडलो नाही. तुला भेटून मायेनं तुझा हात हातात घिवून तुझे गैरसमज दूर केलेवते.. तुला काही फॅक्टस् सांगीतल्यावत्या... नंतर तू लेखकांना फोन केल्यावर तुला कळलं की यात किरण मानेची चूक नव्हती...प्राॅडक्शन हाऊसमधुन लेखकांना सांगीतलं गेलंवतं की सविताताईंना वगळून सीन्स लिहा. तुला कळलं काय झालं असेल ते. ते गुपित तू माझ्याशी बोललीसबी.. आपण हसलो... आणि मग पुन्हा आपलं "म्हातारेS-इलासाS " सुरू झालं... (हे वाचा:Kiran Mane च नव्हे तर 'या' कलाकारांनासुद्धा अचानक केलं होतं रिप्लेस ... ) त्यांनी पुढं लिहीत म्हटलं, "परवा तुला टीव्हीवर तावातावाने माझ्या इरोधात बोलताना मला धक्काच बसला ! वाईट वाटलं.. काळजात आत कायतरी लै तुटल्यागत झालं...पन म्हातारे, तुझ्यावर राग नाही धरणार.. तुझीबी कायतरी मजबूरी आसंल गं... कुनाच्या पोटावर पाय येत असताना कुनी आसं बोलंल व्हय? आत्मा शांत बसंल का त्याचा.. म्हातारे असं बोलल्यावर राती तुला शांत झोप लागली का गं??? तुझ्या स्वामी समर्थांना तू काय कारन सांगीतलंस असं बोलल्याचं???? त्यांच्या फोटोसमोर बसुन तर आपन परवा परवा आपल्यातला गैरसमज मिटवलावता...असो. त्यांची तुझ्यावर कृपा राहो...माझं म्हन्शील तर मी न्याय मिळवल्याशिवाय जीव सोडणार नाही !झगडणार... लढणार...तुला ठावं हाय दुनिया इरोधात गेली तरी सत्य जिंकतं यावर तुझ्या इलासाचा इस्वास हाय... जिंकल्यावर मात्र तुला भेटायला येईन.. येताना मी प्रेमानं तुझ्यासाठी चंद्रविलासची खारी बुंदी आणून देईन.सातारी कंदी पेढे आणून देईन.. पूर्वी आणून देत होतो, तश्शीच.. तेवढ्याच मायेनं !तुझ्यावर राग नाय गं माझा.." अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Marathi entertainment

    पुढील बातम्या