मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'मुलगी झाली हो' चं नवीन पोस्टर आलं समोर, पोस्टरमधून किरण मानेंना वगळलं

'मुलगी झाली हो' चं नवीन पोस्टर आलं समोर, पोस्टरमधून किरण मानेंना वगळलं

 'मुलगी झाली हो'   (Mulgi Zali Ho)  या मालिकेतील अभिनेते किरण माने   (Kiran Mane)   यांना मालिकेतून टाकण्यात आलं आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

'मुलगी झाली हो' (Mulgi Zali Ho) या मालिकेतील अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांना मालिकेतून टाकण्यात आलं आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

'मुलगी झाली हो' (Mulgi Zali Ho) या मालिकेतील अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांना मालिकेतून टाकण्यात आलं आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 15 जानेवारी-   राजकीय टीका केल्याच्या कारणामुळे 'मुलगी झाली हो'   (Mulgi Zali Ho)  या मालिकेतील अभिनेते किरण माने   (Kiran Mane)   यांना मालिकेतून टाकण्यात आलं आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर या प्रकारचा प्रचंड निषेध केला जात आहे. सर्वच स्तरातून लोक या प्रकरणावर आपलं मत मांडत आहेत. दरम्यान 'मुलगी झाली हो' मालिकेचा नवा पोस्टर समोर आला आहे. यामधून अभिनेते किरण माने यांना वगळण्यात आलं आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवर 'मुलगी झाली हो' ही मालिका आपल्या भेटीला येते. या मालिकेत अभिनेते किरण माने महत्वाची भूमिका साकारत होते. या मालिकेत ते विलास पाटीलच्या भूमिकेत दिसत होते. यांनी मुख्य पात्र असणाऱ्या साजिरीच्या वडिलांची भूमिका साकारली होती. प्रेक्षक त्यांना पसंत करत होते. त्यांच्या दमदार अभिनयाचं सतत कौतुकही होत असे. परंतु त्यांना तडकाफडकी मालिकेतून काढून टाकल्यानं सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. नुकताच मालिकेचा नवीन पोस्टर समोर आला आहे. या पोस्टरमध्ये फक्त साजिरी आणि शौनक दिसून येत आहेत. या पोस्टरमधून किरण माने यांना वगळण्यात आल्याचं दिसून येत आहे. जुन्या पोस्टरमध्ये किरण माने यांना महत्वाचं स्थान होतं.

काय म्हणाले किरण माने-

मालिकेतून काढून टाकल्यानंतर किरण माने यांनी काल पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली होती. यावेळी बोलताना ते म्हणाले, 'हे मला सुद्धा धक्कादायक आहे. काम करत असताना, हा वेळेत काम करतोय ना, वेळेत हजर होतोय ना, प्रॉडक्शन हाऊसमध्ये काही तक्रारी आहे का, मानधन कमी घेतो का असं असेल तर समजू शकतो. अनेक वेळातर मेकअप रुममध्ये फॅन नसतो, कलाकारांना टॉयलेट सुद्धा नसतात. अशा अनेक अडचणी सहन केल्या आहे. मी माझे काम चोखपणे बजावले आहे. पण, मी जेव्हा फोन केला तेव्हा कळलं की, मी राजकीय भूमिका घेतो म्हणून मला कामावरून कमी केलं आहे' असं किरण माने यांनी सांगितलं.

(हे वाचा:'ही कोणती झुंडशाही?' मालिकेतून काढल्यानंतर किरण मानेंची पहिली प्रतिक्रिया VIDEO )

मालिकेच्या सेट्वरुन गेल्यांनतर मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे, 'सोशल मीडियावर मी जे काही व्यक्त झालो तो किरण माने वेगळा आहे. राजकीय भूमिका मांडणे हे माझे व्यक्तीगत विचार आहेत. तो माझा हक्क आहे. मी घरात काय खातो, मी बाहेर काय बोलतो, कपडे काय घालतो, यावर कुणीही बंधन ठेवू नये. ही लोकशाही आहे, हा काही अफगानिस्तान नाही, पाकिस्तान नाही. हा भारत आहे, असंही माने म्हणाले.

First published:

Tags: Marathi entertainment