मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'बदनामी' हे या पाताळयंत्री बांडगुळांचं मुख्य जाळं' किरण मानेंची थेट शाहरुख खानसाठी पोस्ट

'बदनामी' हे या पाताळयंत्री बांडगुळांचं मुख्य जाळं' किरण मानेंची थेट शाहरुख खानसाठी पोस्ट

'मुलगी झाली हो'  (Mulgi Zali Ho)  या मालिकेतून तडकाफडकी काढल्यापासून अभिनेते किरण माने (Kiran Mane)  प्रचंड चर्चेत आहेत.

'मुलगी झाली हो' (Mulgi Zali Ho) या मालिकेतून तडकाफडकी काढल्यापासून अभिनेते किरण माने (Kiran Mane) प्रचंड चर्चेत आहेत.

'मुलगी झाली हो' (Mulgi Zali Ho) या मालिकेतून तडकाफडकी काढल्यापासून अभिनेते किरण माने (Kiran Mane) प्रचंड चर्चेत आहेत.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई,3 मार्च- 'मुलगी झाली हो'  (Mulgi Zali Ho)  या मालिकेतून तडकाफडकी काढल्यापासून अभिनेते किरण माने (Kiran Mane)  प्रचंड चर्चेत आहेत. मालिकेने त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता काढल्याचे आरोप त्यांनी केले होते. तर त्यांची वागणूक ठीक नसल्याचं सांगत वाहिनीने स्पष्टीकरण दिलं होतं. त्यांनतर दोन्हीकडून प्रचंड आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. सध्या किरण माने सोशल मीडियावर पोस्ट करत सतत चर्चेत असतात. परंतु आज त्यांनी जी पोस्ट लिहिलीय ती पाहून अनेकजण चकित झाले आहेत.किरण माने यांनी थेट शाहरुख खानसाठी पोस्ट लिहिली आहे.

अभिनेते किरण माने सतत आपल्या सोशल मीडिया पोस्ट आणि रोखठोक बोलण्याने चर्चेत असतात. काहींना त्यांचा हा अंदाज पसंत पडतो. तर काजीं त्यांच्यावर टीका करतात. परंतु तरीसुद्धा ते आपल्या हटके पोस्ट लिहीत असतात. आज त्यांच्या अशाच एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या अभिनेत्याने आता शाहरुख खानच्या संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.

किरण माने पोस्ट-

किरण माने यांनी फेसबुकवर पोस्ट करत लिहिलं आहे, "आपल्या शारख्याचा 'पठान' पिच्चर लागंल तवा लागंल.. आज मात्र त्यानं व्यवस्थित पठान लावला. संविधानिक मार्गानं !एन.सी.बी नं सखोल चौकशी करून आर्यन खानला निर्दोष जाहीर केलेलं हाय. आर्यनकडं कुठलाच अंमली पदार्थ सापडला नाय आनि त्याचा कुठल्याबी आंतरराष्ट्रीय ड्रग गँगशी संबंध असल्याचा पुरावाबी सापडला नाय....कटकारस्थान्यांनी गळ्यात पट्टा बांधून पाळलेले सरकारी अधिकारी किती भिकारचोटपना करत्यात आनि त्यांची विषारी पिलावळ अशा भुरट्या अधिकार्‍यांना 'सिंघम' , 'सिंघम' करत कसं डोक्यावर नाचवत्यात याचं ढळढळीत उदाहरन हाय हे'

'बदनामी' हे या पाताळयंत्री बांडगुळांचं मुख्य जाळं हाय भावांनो... समजून घ्या. हज्जारो वर्षांपास्नं विरोधकांना या जाळ्यातच अडकवत आलेत हे. 'आमचा विरोध कराल तर बदनाम करू.' असा संदेश द्यायचा असतो यांना. त्या बदनामीच्या भितीच्या चिंध्या करून निडरपने पुढं जानारा वाघ एखादाच असतो.. मग त्यो त्यांच्या बापाच्याबी सापळ्यात सापडत नाय !शाहरूख, लब्यू भावा.

(हे वाचा:'श्रद्धेमुळं हे साध्य झालं...'फेसबुकला परत आणावा लागला आशुतोष राणांचा 'शिवतांडव' )

अशी पोस्ट लिहीत किरण माने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नुकतंच क्रूझ ड्रग्स प्रकरणात आर्यन खानकडे कोणतेही अमली पदार्थ न मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला अनुसरुन अभिनेत्याने ही पोस्ट लिहिली आहे.

First published:

Tags: Aryan khan, Marathi entertainment, Shahrukh khan