Home /News /entertainment /

किरण्या तुझा बाजार उठला रे......, Kiran Mane ची मार्मिक पोस्ट चर्चेत

किरण्या तुझा बाजार उठला रे......, Kiran Mane ची मार्मिक पोस्ट चर्चेत

kiran mane

kiran mane

महिला कलाकारांसोबत केलेल्या वर्तवणुकीमुळे आणि तक्रारींमुळे त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचं स्पष्टीकरण स्टार प्रवाह वाहिनीनं दिल्यानंतर किरण माने (Kiran Mane ) यांनी फेसबुकवर लिहिली मार्मिक पोस्ट.

    मुंबई, 17 जानेवारी: मुलगी झाली हो ( Mulgi Jhali Ho) ही स्टार प्रवाहवरील मराठी मालिका सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. किरण माने(Kiran Mane ) यांना या मालिकेतून काढल्यामुळे नवा वाद उफाळून आला आहे. राजकीय पोस्ट केल्यामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकलं गेल्याचा आरोप आधी करण्यात येत होता. दरम्यान, महिला कलाकारांसोबत केलेल्या वर्तवणुकीमुळे आणि तक्रारींमुळे त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचं स्पष्टीकरण स्टार प्रवाह वाहिनीनं दिले. त्यानंतर मालिकेती महिला सहकलाकारांनीही त्यांच्यावर गंभीर आरोप केले.  त्यांच्या या आरोपानंतर किरण माने यांनी पुन्हा एकदा फेसबुक पोस्ट लिहीत तथ्य काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मालिकेत प्रमुख भूमिकेत असलेल्या दिव्या पुगावकर (मावू), शर्वरी पिल्लई (विलास यांची पत्नी), सविता मालपेकर (मुलीची आजी) तसंच मालिकेचे दिग्दर्शक सचिन देव यांनीही किरण मानेंवर गंभीर आरोप केले. या सर्वांवर किरण माने यांनी मार्मिक पोस्ट लिहीत केलेल्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ‘मुलगी झाली हो’ मालिकेतील काहींनी किरण मानेंवर केले गंभीर आरोप तर... काही तासाभरापूर्वीच किरण मानेंनी फेसबुक पोस्ट केली आहे. त्यांची ही पोस्ट मार्मिक असून त्यांनी यामध्ये कोणी काय आरोप केले? कोणी कोणाला कसा पाठिंब दिला हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या या पोस्टनंतर हे प्रकरण कोणते नवे वळण घेते तसेच, सहकलाकारांनी केलेल्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे हे पाहणे उत्सुकत्याचे ठरणार आहे. कारण किरण मानेंना मालिकेतून काढल्यानंतर सोशल मिडीयावर बरीच चर्चा झाली. शरद पवारांची किरण मानेंनी भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं. त्यानंतर स्टार प्रवाह वाहिनीच्या स्पष्टीकरणानंतर सह कलाकारांना विचारलं असता त्यांनी किरण मानेंवरच गंभीर आरोप केलेत. मालिकेतील मुख्य कलाकार दिव्या पुगावकरनं किरण मानेंवर आरोप करताना माने हे सतत टोमणे मारायचे आणि अपशब्द माझ्याशी बोलले, असा आरोप केला. तर किरण माने सेटवर चांगले वागत नसत, असं काही सहकलाकारांचं म्हणणं आहे. किरण माने प्रकरणाला नवं वळण, अभिनेत्यावर वाहिनीकडून गंभीर आरोप तर काही सहकलाकारांनी प्रतिक्रिया देत किरण मानेंना पाठिंबा दिला आहे. किरण माने हे एक चांगली व्यक्ती आहेत. त्यांनी आमच्यापैकी कुणाशीही गैरवर्तन केलेलं नाही. सहकलाकार म्हणून ते नेहमीच पाठीशी उभे राहतात. त्यांनी आतापर्यंत माझ्यासमोर तरी कधीच शिवी दिलेली नाही. कधीच घाणेरड्या भाषेत ते बोललेले नाहीत. व्यक्ती म्हणून ते दिलदार आहेत. अशी प्रतिक्रिया देत एका महिली सहकलाकाराने पाठिंबा दिली आहे.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Marathi entertainment

    पुढील बातम्या