Home /News /entertainment /

मुलगी झाली हो मालिकेत किरण मानेंची जागा घेणार 'हा' लोकप्रिय अभिनेता?

मुलगी झाली हो मालिकेत किरण मानेंची जागा घेणार 'हा' लोकप्रिय अभिनेता?

मुलगी झाली हो ( Mulgi Jhali Ho) मालिकेतून किरण मानेंना काढल्यामुळे नवा वाद उफाळून आला आहे. आता मालिकेत त्यांची जागा एक मराठीतील लोकप्रिय अभिनेता घेणार आहे.

  मुंबई, 18 जानेवारी- मुलगी झाली हो ( Mulgi Jhali Ho) ही स्टार प्रवाहवरील मराठी मालिका सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. किरण माने(Kiran Mane ) यांना या मालिकेतून काढल्यामुळे नवा वाद उफाळून आला आहे. राजकीय पोस्ट केल्यामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकलं गेल्याचा आरोप आधी करण्यात येत होता. दरम्यान, महिला कलाकारांसोबत केलेल्या वर्तवणुकीमुळे आणि तक्रारींमुळे त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचं स्पष्टीकरण स्टार प्रवाह वाहिनीनं दिले. आता या सगळ्यानंतर किरण मानेंची  (kiran mane controversy ) मालिकेतील जागा कोणा घेणार याची देखील चर्चा रंगली होती. आता याबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एक पोर्टलनं दिलेल्या माहितीनुसार, अभिनेते आनंद अलकुंटे( anand alkunte )   मुलगी झाली हो मालिकेत विलास पाटील यांची भूमिका साकारणार आहे. मात्र याबद्दल प्रोडक्सन हाऊसकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. याशिवाय आनंद अलकुंटे  आता किरण मानेंनी साकारलेल्या विलास पाटील यांच्या भूमिकेला न्याय देऊ शकतील का?
  View this post on Instagram

  A post shared by (@marathiserials_official)

  यापूर्वी किरण माने यांना मालिकेतून काढल्यानंतर लगेचच त्यांना मुलगी झाली हो मालिकेच्या पोस्टरमधून वगळण्यात आलं होतं. या पोस्टरमध्ये फक्त साजिरी आणि शौनक दिसून येत आहेत. या पोस्टरमधून किरण माने यांना वगळण्यात आल्याचं दिसून येत आहे. जुन्या पोस्टरमध्ये किरण माने यांना महत्वाचं स्थान होतं. वाचा-शिर्के-पाटील कुटुंबात दोन चिमुकल्यांचे आगमन; नेमकी कुणाची आहेत ही मुलं? स्टार प्रवाह वाहिनीवर 'मुलगी झाली हो' ही मालिका आपल्या भेटीला येते. या मालिकेत अभिनेते किरण माने महत्वाची भूमिका साकारत होते. या मालिकेत ते विलास पाटीलच्या भूमिकेत दिसत होते. यांनी मुख्य पात्र असणाऱ्या साजिरीच्या वडिलांची भूमिका साकारली होती. प्रेक्षक त्यांना पसंत करत होते. त्यांच्या दमदार अभिनयाचं सतत कौतुकही होत असे. परंतु त्यांना तडकाफडकी मालिकेतून काढून टाकल्यानं सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, TV serials

  पुढील बातम्या