Home /News /entertainment /

'देवमाणूस 2' मध्ये डॉक्टरच्या भूमिकेत किरण गायकवाड दिसणार नाही? पोस्टमुळे प्रेक्षकांच्या मनात गोंधळ

'देवमाणूस 2' मध्ये डॉक्टरच्या भूमिकेत किरण गायकवाड दिसणार नाही? पोस्टमुळे प्रेक्षकांच्या मनात गोंधळ

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘देवमाणूस’(Devmanus). या मालिकेने 15 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता मालिकेचा दुसरा सिजन (Devmanus season 2) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

    मुंबई, 2 डिसेंबर : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘देवमाणूस’(Devmanus). या मालिकेने 15 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता मालिकेचा दुसरा सिजन (Devmanus season 2) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. देवमाणूस २ या मालिकेचे चित्रीकरण नुकतेच सुरू झाल्याचे श्वेता शिंदेने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. त्यामुळे ती परत आलीये ह्या मालिकेच्या जागी आता देवमाणूस ही नवी मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. डॉक्टरची भूमिका अभिनेता किरण गायकवाड याने साकारली होती. मात्र आता या दुसऱ्या सिजनमध्ये डॉक्टरच्या भूमिकेत किरण गायकवाड दिसणार की नाही यावरून प्रेक्षकांच्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे. हा सगळा गोंधळ किरण जाधवच्या इन्स्टा स्टेटसमुळे झाला आहे. किरण गायकवाडने त्याच्या इन्स्टा स्टोरीला स्व:ताचा फोटो पोस्ट करत पण यावेळी मी नाही असं लिहिलं होते. यामुळे मात्र प्रेक्षकांच्या मनात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे की, डॉक्टरच्या भूमिकेत कोण दिसणार. मात्र हा पब्लिसिटी स्टंट असल्याचा समोर आला आहे. त्यामुळे प्रेक्षाकांना देखील दिलासा मिळाला आहे. त्यामुळ डॉक्टरच्या भूमिकेत किरण गायकवाड दिसणार असल्याचे नक्की आणि पक्क झालं आहे. देवमाणूसच्या दुसऱ्या सीजनची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असून मालिकेचे अनेक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मालिकेचा नवीन प्रोमो पाहून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. दुसऱ्या सिजनचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. प्रमोशनसाठी डॉक्टरचा पुतळा देखील उभारण्याता आला होता. विविध पद्धतीने सध्या मालिकेचे प्रमोशन सुरू आहे. वाचा: प्रियांकाचा नवरा निक जोनस बॉलिवूडमध्ये करू शकतो एन्ट्री; फक्त एका गोष्टीची पाहतोय वाट काय होता मालिकेचा शेवट? 15 ऑगस्टला मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला. त्यामुळे चाहते फारच उत्सुक होते. पण शेवटी प्रेक्षकांची निराशाच झालेली पाहायला मिळाली. आता तरी देवी सिंग पोलिसांच्या ताब्यात जाईल असं प्रेक्षकांना वाटत होतं पण तसं झालं नाही.दरम्यान शेवटी चंदाचा आणि विजयचा मृत्यू दाखवला आहे. याशिवाय नव्यानेच मालिकेत एन्ट्री दाखवलेल्या स्त्रीचा देखील डॉक्टर ने खून केलेला दाखवला आहे. वाड्यातील लोकांना देवमाणसाचा खरा चेहरा मात्र समजला नाही.चंदा आणि डॉक्टरचा मृत्यू झाल्याचं लोकांना समजत. तर डॉक्टरच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. एकूणच संपूर्णपणे अनपेक्षित शेवट पाहायला मिळाला आहे.
    दरम्यान डॉक्टरचा मृत्यू झाला नसून तो जिवंत आहे. डिम्पलने चंदाचा खून केला. तर तिची बॉडी देखील जाळून टाकली. याशिवाय आणखी एक बॉडी तिथे जळत असते. तिच्या आजूबाजूला डॉक्टर च साहित्य पसरवलेल असतं. त्यामुळे डॉक्टरचाच मृत्यू झाल्याचं डिम्पलने भासावल होतं. तर आता ती देखील घरातून पळून गेली आहे.डॉक्टर एका दवाखान्यात अॅडमिट आहे. व तो अजूनही जिवंत आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांमध्ये ‘देवमाणूस 2’ची (Devmanus season 2) उत्सुकता वाढली आहे. तर मालिकेचा अद्याप शेवट झाला नसल्याने आणखी एक भाग येणार अशी चर्चा रंगताना दिसत आहे. अनेकांनी शेवट योग्य केला नाही यामुळे नाराजी व्यक्त केली होती.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Marathi entertainment, TV serials, Zee marathi serial

    पुढील बातम्या