मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘देवी सिंगला विसरणं अशक्य’; प्रेक्षकांचा निरोप घेताना ‘देवमाणूस’ झाला भावुक

‘देवी सिंगला विसरणं अशक्य’; प्रेक्षकांचा निरोप घेताना ‘देवमाणूस’ झाला भावुक

येत्या 15 ऑगस्टला देवमाणूस प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. परंतु यामुळे मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) उर्फ डॉ. अजितकुमार देव प्रचंड भावुक झाला.

येत्या 15 ऑगस्टला देवमाणूस प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. परंतु यामुळे मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) उर्फ डॉ. अजितकुमार देव प्रचंड भावुक झाला.

येत्या 15 ऑगस्टला देवमाणूस प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. परंतु यामुळे मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) उर्फ डॉ. अजितकुमार देव प्रचंड भावुक झाला.

  मुंबई 13 ऑगस्ट: देवमाणूस (Devmanus) ही मालिका छोट्या पडद्यावर अक्षरश: धुमाकूळ घालताना दिसतेय. एकामागून एक येणारे ट्विस्ट आणि कलाकारांचा जबरदस्त अभिनय यामुळे देवमाणूसने अल्पावधीच लोकप्रियतेचं शिखर गाठलं. (Devmanus TV Serial) मात्र या मालिकेचा आता उत्तरार्ध सुरू झाला असून येत्या 15 ऑगस्टला देवमाणूस प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. परंतु यामुळे मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) उर्फ डॉ. अजितकुमार देव प्रचंड भावुक झाला. ही भुमिका मी कधीही विसरू शकणार नाही असं म्हणत त्याने प्रेक्षकांचे आभार मानले. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत किरणने देवमाणूस मालिकेवर भाष्य केलं. त्यावेळी स्वत:चे अभुभव सांगताना तो भावुक झाला. म्हणाला, “देवमाणूस या मालिकेने माझी एक वेगळी ओळख निर्माण केली. या मालिकेमुळेच मी खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलो. या भूमिकेने मला प्रेक्षकांचं अफाट प्रेम आणि पाठिंबा मिळवून दिला. ही मालिका जरी प्रेक्षकांचा निरोप घेणार असली तरी या मालिकेने त्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे जे अढळ आहे. सध्या डॉक्टर अजितकुमारच्या भूमिकेला जरी पूर्णविराम लागला असला तरी पुन्हा एकदा वेगळं काहीतरी घेऊन मायबाप प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होईन. तो पर्यंत प्रेक्षकांनी अजितकुमारवर प्रेम करत राहावं आणि हा विशेष भाग जरूर पाहावा.” देशासाठी बलिदान दिलेल्या 'शेरशाह'ची प्रेमकहाणी आणेल डोळ्यात पाणी; प्रेयसी आजही विक्रमच्या प्रतीक्षेत
  ट्विटरवर ट्रेंड होतंय #BoyCottRadhikaApte;‘त्या’ न्यूड सीनमुळे होतेय ट्रोल ‘देवमाणूस’ ही मालिका साताऱ्यात घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. या ठिकाणी अगदी मालिकेत दाखवल्याप्रमाणेच एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीनं डॉक्टराचं सोंग पांघरुन 13 वर्षात तब्बल सात स्त्रियांना फसवलं. या गुन्हेगाराला देखील पोलिसांनी अशाच प्रकारे पकडलं होतं. या पार्श्वभूमीवर ‘देवमाणूस’ मालिकेचा शेवटही असाच होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘देवमाणूस’ या मालिकेतील ‘सरू आजी, डिम्पल, टोण्या, बज्या, विजय,नाम्या, मंजुळा आणि डॉ. अजित कुमार देव’ ही आणि अशी अनेक पात्र प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालतायत. रंजक आणि रहस्यमयी कथानकामुळं ही मालिका लोकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रत्येक एपिसोडगणिक मालिकेची उत्कंठा वाढत आहे. येत्या काळात मालिका आणखी रंगत जाणार यात शंका नाही. ‘देवमाणूस’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 10.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.
  Published by:Mandar Gurav
  First published:

  Tags: Zee marathi serial

  पुढील बातम्या