मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘शूटिंगचा पहिला दिवस आठवतोय’; देवमाणूसचा शेवटचा भाग शूट करताना कलाकार भावुक

‘शूटिंगचा पहिला दिवस आठवतोय’; देवमाणूसचा शेवटचा भाग शूट करताना कलाकार भावुक

बजा याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा सीन शूट करताना आलेला अनुभव त्याने या व्हिडीओद्वारे शेअर केला आहे.

बजा याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा सीन शूट करताना आलेला अनुभव त्याने या व्हिडीओद्वारे शेअर केला आहे.

बजा याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा सीन शूट करताना आलेला अनुभव त्याने या व्हिडीओद्वारे शेअर केला आहे.

मुंबई 13 ऑगस्ट: देवमाणूस (Devmanus) ही मालिका छोट्या पडद्यावर अक्षरश: धुमाकूळ घालताना दिसतेय. एकामागून एक येणारे ट्विस्ट आणि कलाकारांचा जबरदस्त अभिनय यामुळे देवमाणूसने अल्पावधीच लोकप्रियतेचं शिखर गाठलं. (Devmanus TV Serial) मात्र या मालिकेचा आता उत्तरार्ध सुरू झाला असून येत्या 15 ऑगस्टला देवमाणूस प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. परंतु यामुळे मालिकेतील सर्वच कलाकार भावुक झाले आहेत. शेवटचा भाग शूट करतानाचा काढलेला एक व्हिडीओ अभिनेता किरण डांगे (Kiran Dange) उर्फ बजा याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा सीन शूट करताना आलेला अनुभव त्याने या व्हिडीओद्वारे शेअर केला आहे.

“रात्रीचा एक वाजला आहे. देवमाणूस मालिकेचा शेवटचा भाग शूट करतोय. आजवर प्रेक्षकांनी आम्हाला भरपूर प्रेम दिलं. आदर सन्मान दिला. त्यामुळे प्रेक्षकांचा निरोप घेताना खूप गहिवरून आलं आहे. डोळे भरून आलेत. काय बोलावं कळत नाहिये. आज आम्हाला मालिकेचा पहिला दिवस आठवतोय. आज बरोबर एक वर्ष पुर्ण झालं आहे. सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार” असं म्हणत देवमाणूसमधील सर्व कलाकारांनी भावुक होत निरोप घेतला.

खरंच ही तीच आहे का? मराठी अभिनेत्रीचा इतका बदलला लुक

वो हसीना..! नोरा फेतेहीने पुन्हा केलं चाहत्यांना घायाळ; ग्लॅमरस लुक पाहून चाहते 'Speechless'

‘देवमाणूस’ ही मालिका साताऱ्यात घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. या ठिकाणी अगदी मालिकेत दाखवल्याप्रमाणेच एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीनं डॉक्टराचं सोंग पांघरुन 13 वर्षात तब्बल सात स्त्रियांना फसवलं. या गुन्हेगाराला देखील पोलिसांनी अशाच प्रकारे पकडलं होतं. या पार्श्वभूमीवर ‘देवमाणूस’ मालिकेचा शेवटही असाच होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘देवमाणूस’ या मालिकेतील ‘सरू आजी, डिम्पल, टोण्या, बज्या, विजय,नाम्या, मंजुळा आणि डॉ. अजित कुमार देव’ ही आणि अशी अनेक पात्र प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालतायत. रंजक आणि रहस्यमयी कथानकामुळं ही मालिका लोकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रत्येक एपिसोडगणिक मालिकेची उत्कंठा वाढत आहे. येत्या काळात मालिका आणखी रंगत जाणार यात शंका नाही. ‘देवमाणूस’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 10.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

First published:

Tags: Viral videos, Zee marathi serial