'मोगँबो खूश हुआ...', किंग खान पुन्हा एकदा व्हिलन ?

'मोगँबो खूश हुआ...', किंग खान पुन्हा एकदा व्हिलन ?

गेल्या वर्षभरात शाहरुखचा कोणताही चित्रपट आलेला नाही. 2018 मध्ये ‘झिरो’ नंतर किंग खान कोणताही चित्रपट घेऊन आलेला नाही. पण लवकरच शाहरुख जबरदस्त कमबॅक करण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 17 फेब्रुवारी : बाजीगर, डर तसंच अंजाम यांसारख्या चित्रपटांमधील शाहरुखच्या नेगेटिव्ह भूमिका बॉलीवूडमधील काही सर्वोत्कृष्ट अभिनयांपैकी एक मानले जातात. करिअरच्या सुरूवातीच्या काळातच नकारात्मक भूमिका (negative role) करण्याची जोखीम धोका शाहरुखने पत्करली होता आणि त्यात तो यशस्वी देखील झाला. त्यानंतर सर्वच प्रकारच्या भूमिकेमध्ये शाहरुख प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. पण त्याच्या नकारात्मक भूमिका इतक्या वर्षानंतरही लक्षात राहण्यासारख्या आहेत. आता पुन्हा एकदा शाहरुख अशाच एका महत्त्वपूर्ण नकारात्मक भूमिकेमध्ये दिसणार आहे.

गेल्या वर्षभरात शाहरुखचा कोणताही चित्रपट आलेला नाही. 2018 मध्ये ‘झिरो’ नंतर किंग खान कोणताही चित्रपट घेऊन आलेला नाही. पण लवकरच शाहरुख जबरदस्त कमबॅक करण्याची शक्यता आहे. चित्रपटसृष्टीमध्ये अशी चर्चा आहे की शाहरुख खान रणवीर सिंहबरोबर मिस्टर इंडिया-2 मध्ये दिसणार आहे.

(हेही वाचा-VIDEO : सई ताम्हणकरच आहे 'सविता भाभी', पाहा 'अश्लील उद्योग...'ची पहिली झलक)

टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार दिग्दर्शक अली अब्बास जफर 1987चा जबरदस्त चित्रपट ‘मिस्टर इंडिया’चा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. 'मिस्टर इंडिया' चित्रपट 87 मधील विशेष गाजलेला सिनेमा होता. गाण्यांबरोबरच या चित्रपटातील संवादही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते.

मोगँबोच्या भूमिकेची विशेष चर्चा

'मोगँबो खूश हुआ' हा डायलॉग म्हटला की आपल्या डोळ्यासमोर अमरीश पूरी येतात. मात्र आता हाच डायलॉग आता 'किंग खान' म्हणण्याची शक्यता आहे. बी-टाउनमध्ये सुरु असलेल्या चर्चेनुसार अनिल कपूरची भूमिका रणवीर सिंग साकारणार आहे. तर मोगँबोच्या भूमिकेसाठी निर्मात्यांकडून शाहरुखला विचारण्यात आलं आहे. दरम्यान याबाबत शाहरुखकडून कोणतीच पुष्टी मिळालेली नाही. मात्र रणवीर सिंह त्याच्या भूमिकेसाठी खूप उत्सुक असल्याचं समजतंय. हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

First published: February 17, 2020, 5:16 PM IST
Tags:

ताज्या बातम्या