'कसौटी जिंदगी की 2'च्या प्रोमोसाठी शाहरूख खाननं घेतले 'इतके' कोटी

'कसौटी जिंदगी की 2'च्या प्रोमोसाठी शाहरूख खाननं घेतले 'इतके' कोटी

एकता कपूर आणि शाहरूख खाननं मिळून या मालिकेचा प्रोमो शूट केलाय.

  • Share this:

मुंबई, 28 आॅगस्ट : एकता कपूरची 'कसौटी जिंदगी की 2' पुन्हा एकदा 10 वर्षांनी छोट्या पडद्यावर येतोय. त्याची तयारीही जोरदार सुरू आहे. या नव्या रूपातल्या मालिकेत नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. छोट्या पडद्यावर कसौटी जिंदगी की भरपूर गाजली होती. एकता कपूर त्याचा सीक्वल बनवतेय. आणि प्रेरणाची भूमिका एरिका फर्नांडिस करतेय. पण प्रश्न होता तो अनुरागच्या भूमिकेत कोण? तर तेही आता समजलंय. पार्थ समथान ही भूमिका करतोय. पण तुम्हाला माहीत आहे का, यात शाहरूख खानही आहे.

एकता कपूर आणि शाहरूख खाननं मिळून या मालिकेचा प्रोमो शूट केलाय. आणि त्यासाठी किती पैसे घेतलेत ठाऊकेय? तब्बल 8 कोटी रुपये. त्यात किंग खाननं एकता कपूरसोबतच्या प्रोमोला 5 कोटी घेतले, तर नंतर तीन प्रोमो केले त्याला 1,1 कोटी घेतलेत.

शाहरूख खान या मालिकेसाठी आपला आवाजही देणार आहे. सुरुवातीला एकूणच या मालिकेचा इतिहास शाहरूखच्या आवाजात ऐकायला मिळणार आहे. ही मालिका 10 सप्टेंबरपासून सुरू होतेय.

या मालिकेत अनुरागच्या मोठ्या बहिणीच्या भूमिकेत सुमोना चक्रवर्ती आहे.छोट्या पडद्यावर कपिलची बायको म्हणून प्रसिद्ध होती. बडे अच्छे लगते है मालिकेत तिनं राम कपूरच्या बहिणीची भूमिका साकारली होती.

कसौटी जिंदगी की ही मालिका 2001मध्ये सुरू झाली होती. आणि ती प्रेक्षकांची लाडकी मालिका बनली. आता हा सीक्वल किती प्रेक्षकांना धरून ठेवतोय, ते कळेल.

सुरू होतोय केबीसीचा नवा सीझन, जाणून घ्या यावेळी काय आहे खास?

First published: August 28, 2018, 3:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading