मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Kim Kardashianच्या एक्स मॅनेजरची हत्या, बॉयफ्रेंडनेच काढला काटा

Kim Kardashianच्या एक्स मॅनेजरची हत्या, बॉयफ्रेंडनेच काढला काटा

Kim Kardashian

Kim Kardashian

23 डिसेंबर रोजी सिमी व्हॅली परिसरात अँजेलाचा मृतदेह आढळून आला होता. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अँजेला 22 डिसेंबर रोजी बेपत्ता झाल्याचे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

लॉस एंजेलिस, 30 डिसेंबर: लॉस एंजेलिसमधील एक बिझनेस मॅनेजर जिने Kim Kardashian आणि रॅपर Nicki Minaj साठी काम केले आहे, तिचा धक्कादायक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अमेरिकन मीडिया स्टार आणि बिझनेस वुमन किम कारदर्शियनची पूर्व -मॅनेजर अँजेला कुकाव्स्कीचे (Kim Kardashians Manager Angela Kukawski) निधन झाले असून तिची हत्या झाल्याचे समोर आले आहे. लॉस एंजेलिस पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अँजेला कुकाव्स्की तिच्या कारमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती. 23 डिसेंबर रोजी सिमी व्हॅली परिसरात अँजेलाचा मृतदेह आढळून आला होता. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अँजेला 22 डिसेंबर रोजी बेपत्ता झाल्याचे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

लॉस एंजेलिस पोलिसांनी बुधवारी अशी माहिती दिली की त्यांनी तिचा प्रियकर जेसन बार्करला तिच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. अँजेला कुकाव्स्कीच्या मृत्यूची (Angela Kukawski Murder) चौकशी करणार्‍या अधिकार्‍यांनी या घटनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या मते, 55 वर्षीय अँजेलाची हत्या तिचा 49 वर्षीय प्रियकर जेसन बार्कर (Angela Kukawski Boyfriend) याने शर्मन ओक्स याने केली आहे. खून केल्यानंतर शर्मनने अँजेलाचा मृतदेह आपल्या कारमध्ये नेऊन सिमी व्हॅलीमध्ये सोडल्याचा आरोप आहे. मृतदेह सापडल्यानंतर आणि तपास केल्यानंतर पोलिसांनी 23 डिसेंबर रोजी याप्रकरणी त्याला अटक केली.

हे वाचा-Big News: कॅन्सरशी झुंज अपयशी! बॉलिवूडच्या प्रसिद्ध निर्मात्याचं लंडनमध्ये निधन

जेसन बार्कर याला 28 रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. यादरम्यान त्याच्यावर अँजेलाची निर्घृण हत्या आणि छळ केल्याचा आरोप होता. एका अहवालानुसार, जेसनला तिचा बदला घेण्याच्या, जबरदस्तीने वसुली करण्याच्या, वेदना आणि त्रास देण्याच्या उद्देशाने अँजेलाला शारीरिक दुखापत करायची होती.

First published:
top videos