का रे दुरावा...? या कारणामुळे एकमेकांपासून वेगळं राहतं हॉलिवूडचं 'आऊटस्टँडिंग कपल'

किम कर्दाशिअन (Kim Kardashian) आणि रॅपर कान्ये वेस्ट (Kanye West) यांची जगात 'आऊटस्टँडिंग कपल' (Outstanding Couple) अशी ओळख आहे. गेल्या काही दिवसांपासून हे कपल एकमेकांपासून वेगळं रहात आहे.

किम कर्दाशिअन (Kim Kardashian) आणि रॅपर कान्ये वेस्ट (Kanye West) यांची जगात 'आऊटस्टँडिंग कपल' (Outstanding Couple) अशी ओळख आहे. गेल्या काही दिवसांपासून हे कपल एकमेकांपासून वेगळं रहात आहे.

  • Share this:
    वॉशिंग्टन 15 डिसेंबर : अमेरिकन मॉडेल, रिअलिटी टीव्ही स्टार, सोशल मीडिया सेलिब्रिटी किम कार्दाशियन (Kim Kardashian) आणि 43 वर्षीय प्रसिद्ध ग्रॅमी अ‍ॅवॉर्ड विजेता रॅपर स्टार, फॅशन डिझायनर, निर्माता कान्ये वेस्ट (Kanye west) या जोडीचे जगभरात असंख्य चाहते आहेत. ही जोडी वेगळी होण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे, दोघेही सध्या वेगवेगळ्या ठिकाणी रहात आहेत. किम सध्या आपल्या मुलांसह लॉस एंजेलिस (Los Angeles) इथं रहात आहे, तर कान्ये वेस्ट त्याच्या व्योमिंग (Wyoming) रँचवर रहात आहे. पण ‘युके मिरर’ (UK Mirror)नं दिलेल्या वृत्तानुसार,ही लोकप्रिय जोडी एकत्र राहत नसली तरी त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आपलं वैवाहिक नातं, कुटुंब टिकवून ठेवण्यासाठी ते कायम धडपडत असतात. कान्ये सध्या व्योमिंग रँच इथं राहून गाणी लिहिण्यात व्यस्त आहे. दोघंही आपापल्या कामात व्यस्त असल्याने ते  वेगवेगळ्या ठिकाणी राहतात मुलांसह किम अनेकदा कान्येला भेटण्यासाठी जात असते. दोघंही मुलांबरोबर खूप वेळ घालवतात. ते एकत्र राहत नसले तरी त्यांच्यात अजूनही प्रेम असल्याचं दिसून येतं. सार्वजनिक ठिकाणी दोघंही एकत्र असतात. तसेच किम सोशल मीडियावर नेहमी मुलांसह तिचे आणि कान्येचे फोटो शेअर करत असते.
    यावरूनच कान्ये किमला गमावणार नाही तसेच किमदेखील कन्येला सोडणार नाही असं स्पष्ट दिसून येतं. त्याचं नातं सध्या जसं आहे तसंच पुढे नेण्याचा ते विचार करत आहेत. आजही ते एकमेकांच्या सतत संपर्कात असतात. हे मात्र खरं त्याचं नातं पूर्वीसारखं नाही पण ते घटस्फोटाच्या (Divorcee) पातळीपर्यंत पोहोचलेलं नाही, असं या सूत्रांनी सांगितलं. कान्येनं व्योमिंग रँचला  शेकडो एकरवर पसरलेली 14 दशलक्ष डॉलर्सला खरेदी केली असून, इथं सलून, रेस्टॉरंट, ऑफीस, घोडेस्वारीसाठी मैदान अशा अनेक सुविधांसह अत्याधुनिक शूटिंग रेंजही आहे.
    Published by:News18 Desk
    First published: