किम कार्दशियनचा व्हिडिओ व्हायरल, 'ही' विचित्र वस्तू पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ किमच्या एका फॅनपेजवर शेअर करण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 27, 2019 02:58 PM IST

किम कार्दशियनचा व्हिडिओ व्हायरल, 'ही' विचित्र वस्तू पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

मुंबई, 27 एप्रिल :अभिनेत्री किम कार्दशियन फक्त हॉलिवूडमध्येच नाही तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर तिचे जवळपास 135 मिलियन फॉलोअर्स आहेत. नेहमी आपल्या हॉट फोटोंमुळे चर्चेत असणारी किम सध्या मात्र एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी किमच्या शानदार बाथरूमचा व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमध्ये बाथरुममधील आधुनिक टेक्नॉलॉजी पाहायला मिळत आहे. या सिंकची सगळ्यात खास बाब काय असेल तर ती म्हणजे याला बेसिन नाही. हा एक मिनिमेलिस्ट सिंक आहे. पण या बेसिन नसलेल्या सिंकमुळे किमचे चाहते मात्र बुचकळ्यात पडले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

वाचा : गेली ३० वर्ष हा अभिनेता लढतोय एड्सची लढाई, कधीही होऊ शकतो मृत्यू
Loading...

 

View this post on Instagram
 

bathroom tour!


A post shared by Kim Kardashian Snapchat 🍑 (@kimkardashiansnap) on


वाचा : अभिषेकने मला लग्नातही बोलावलं नाही म्हणजे..., राणीने व्यक्त केली होती तिच्या मनातली खंत

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ किमच्या एका फॅनपेजवर शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे हा अलिशान बाथरूम किमचा असल्याचं बोललं जात आहे. या बाथरुममधील बाथटब आणि शॉवर व्यतिरिक्त त्याचं अन्य डिझाइनसुद्धा खूप आकर्षक आहे. पण या बाथरुमधील बेसिन नसलेल्या सिंकनं लोकांची उत्सुकता वाढवली आहे. या टेक्नॉलॉजीविषयी जाणून घेण्यास लोक खूपच उत्सुक असल्याचं त्यांच्या प्रतिक्रियांवरुन दिसत आहे. एका युजरनं लिहिलं, कोणी किमच्या बाथरुममधील या सिंकबद्दल विस्तृत माहिती सांगेल का? तर दुसरा एक युजर म्हणतो, बेसिन नसलेला सिंक कसा शक्य आहे.

वाचा : आता सलमान खानशी भिडणार आलिया आणि रणबीर कपूर

अभिनेत्री किम कार्दशियन ही अमेरिकतील एक प्रसिद्ध व्यक्ती आहे. तिनं आतापर्यंत बियॉन्ड द ब्रेक, ड्रॉप डेड डिवा, एंटरटेनमेंट टुनाइट सारख्या लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहतावर्ग असलेल्या किमचा कोणताही फोटो किंवा व्हिडिओ लगेचच सगळीकडे व्हायर होतो. किमनं 2014 मध्ये कान्ये वेस्टशी लग्न केलं आहे. हे तिचं तिसरं लग्न आहे.

वाचा : दीपिका पदुकोण आणि अमृता रावमध्ये आहे 'हे' नातं, फॅमिली फंक्शनमध्ये दिसले एकत्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2019 02:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...