बाबो! एक गरम चाय की प्याली तब्बल 78 हजारांची, अभिनेत्यानं शेअर केलं बिल

बाबो! एक गरम चाय की प्याली तब्बल 78 हजारांची, अभिनेत्यानं शेअर केलं बिल

टीव्हीवरील या प्रसिद्ध कॉमेडियनला एक कप चहा आणि एक कॅपचीनो कॉफीसाठी तब्बल 78,650 रुपये मोजावे लागले.

  • Share this:

मुंबई, 05 सप्टेंबर : काही दिवासांपूर्वी अभिनेता राहुल बोस याला अवघ्या  2 केळ्यांसाठी 442 रुपये मोजवे लागले होते. तसेच एका प्रसिद्ध अभिनेत्रीला जेवणात कीडे सापडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता टीव्ही वरील प्रसिद्ध कॉमेडियन कीकू शारदा सोबतही असंच काहीसं घडलं आहे. कीकूला एक कप चहा आणि एक कॅपचीनो कॉफीसाठी तब्बल 78,650 रुपये मोजावे लागले. या बिलाचा फोटो कीकूनं त्याच्या ट्विटर हँडलवर शेअर केला. सध्या त्याच्या या ट्वीटची सगळीकडे चर्चा होत आहे.

कीकूनं त्याच्या या बिलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि याविषयीची पूर्ण माहिती सुद्धा शेअर केली आहे. कीकूनं लिहिलं, ‘मला एका कॅपचीनोसाठी हजारोंचं बिल भरावं लागलं मात्र मी त्याची तक्रार करत नाही आहे.’ कीकूला भराव्या लागलेल्या बिलानुसार एक गरम चहासाठी 30000 आणि एका कॅपचीनोसाठी 35000 आणि सर्व्हिस चार्ज 13650 रुपये वसूल करण्यात आले. म्हणजे एकून 78 हजारांपेक्षा जास्त रुपयांचं बिल कीकूला भरावं लागलं.

गणपतीसमोरच्या या फोटोमुळे अजूनही ट्रोल होतेय सारा अली खान

या सर्व प्रकारानंतर कीकूनं याविषयी तक्रार न करण्याबद्दल लिहून काही दिवसांपूर्वी अभिनेता राहुल बोससोबत घडलेल्या प्रकरणाचीही ठवण करुन दिली. भारतातल्या एका 5 स्टार  हॉटेलनं दोन केळ्यांसाठी राहुल कडून 442 रुपये वसुल केले होते. मात्र कीकूनं याविषयी तक्रार न करण्यामागे एक वेगळचं कारण आहे.

आलिया भट आणि रणबीर कपूरचं लग्न? VIRAL PHOTOचं हे आहे सत्य

कीकूसोबत घडलेला हा प्रकार भारतातल नाही तर परदेशातला आहे. सध्या कीकू बाली इंडोनेशियामध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. आता सर्वांनाच माहित आहे, इंडोनेशियाचं चलन हे भारताच्या रुपयाच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामुळे अनेकजण परदेशी टूरसाठी इंडोनेशियाचा पर्याय निवडतात.

कीकूनं त्याच्यासोबत घडलेल्या या प्रकाराचा खुलासा केला. त्यानं सांगितलं, बालीच्या 78,650च्या बिलाचे भारतीय रुपयांत रुपांतर केलं तर ते 400 रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे आपण चहाच्या किंमतीबाबत तक्रार करत नसल्याचं कीकूनं स्पष्ट केलं. कीकू शारदा द कपिल शर्मा शोमध्ये महत्त्वाची भूमिका साकारतो.

एस्कॉर्ट सर्व्हिसच्या पोस्टरवर अभिनेत्रीचा फोटो; पुढे जे काही झाले ते...

==========================================================

SPECIAL REPORT : प्रकाश आंबेडकर MIM ला दाखवणार कात्रजचा घाट?

Published by: Megha Jethe
First published: September 5, 2019, 8:54 AM IST

ताज्या बातम्या