Home /News /entertainment /

संपत्तीच्या वादातून प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईचं अपहरण, पंतप्रधानांकडेही मागितली मदत

संपत्तीच्या वादातून प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईचं अपहरण, पंतप्रधानांकडेही मागितली मदत

या अभिनेत्रीलाही जीवे मारण्याची धमकी मिळत आहे.

  इस्लामाबाद, 17 जून : पाकिस्तानी अभिनेत्री आणि टिव्हीवरील प्रसिद्ध प्रेजेंटर मीरा (Pakistani actress Meera) सध्या मोठ्या संकटाचा सामना करीत आहेत. अभिनेत्रीला भारतात तिच्या विनोदी व्हिडीओसाठी ओळखले जाते. तिने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटातदेखील काम केलं आहे. अशात एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. मीराला पाकिस्तानात जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. दरम्यान अभिनेत्रीच्या घरावर हल्ला झाला आहे आणि तिच्या आईचं अपहरण करण्यात आलं आहे. मीराच्या लाहोर येथील घरात मंगळवारी मोठी घटना घडली. याबाबत अभिनेत्रीने सांगितलं की, काही जण माझी प्रॉपर्टी बळकावण्याचा प्रयत्न करीत आहे. तिच्याविरोधात कारस्थानही केलं जात आहे. अशात पाकिस्तानातील वृत्तपत्र डेली जंगमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार, मीराने पाकिस्तान सरकारकडे मदत मागितली आहे. येथे अभिनेत्रीने सरकारने स्वत: आणि कुटुंबासाठी सुरक्षेची मागणी केली आहे. यासोबत अभिनेत्रीने कॅपिटल सिटी पोलीस ऑफिसमध्ये या घटनेबाबत अर्ज दाखल केला आहे. ज्यात त्यांनी सांगितलं की, कशा प्रकारे त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आणि तिच्या कुटुंबाला त्रास दिला जात आहे. हे ही वाचा-मोठ्या कष्टानं घरात शिरला मात्र नाही आवरला अंघोळीचा मोह, चोराची झाली भलतीच फजिती अभिनेत्रीने अलीकडेच एक्सप्रेस ट्रिब्यूनशीही संवाद साधला. त्यांनी आपल्या खास बातचीतमध्ये सांगितलं की, मला मियां शाहिद मेहमूद नावाच्या व्यक्तीकडून धोका आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Meera (@meerajeeofficial)

  त्याला माझी जमीन बळकावयची आहे. त्याला माझी मालमत्ता  घ्यायची आहे. आता त्याने माझ्या आईचेही अपहरण केले आहे. लाहोर पोलिसांना अर्ज लिहिले असल्याचे अभिनेत्रीने सांगितले आहे. ज्यामध्ये त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचीही मदत घेतली आहे. अभिनेत्रीने पुढे लिहिलं आहे की, मी पाकिस्तान सरकारकडे मदत मागत आहे. या प्रकरणात ज्यांच्यावर आरोप केला ते शाहिद महमूद यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, मीराच्या आईकडून मी संपूर्ण प्रॉपर्टी खरेदी केली आहे. याचे सर्व पैसे मी त्यांना दिले आहेत. मात्र जेव्हा मी प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट मागितले तेव्हा मला ते देण्यात आले नाही.
  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Actress, Crime news, Pakisatan

  पुढील बातम्या