मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

फोटोतील चिमुकल्याला ओळखलंत का?, त्याच्या बायकोनंही किंग खानसोबत केलाय रोमान्स

फोटोतील चिमुकल्याला ओळखलंत का?, त्याच्या बायकोनंही किंग खानसोबत केलाय रोमान्स

शाहरुख खान

शाहरुख खान

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचे लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लहानपणीचे कलाकार आणि सध्या मोठे झाल्यावर त्यांच्यामध्ये जमीन आसमानाचा बदल झाल्याचं दिसून येतं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 7 ऑक्टोबर : बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचे लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लहानपणीचे कलाकार आणि सध्या मोठे झाल्यावर त्यांच्यामध्ये जमीन आसमानाचा बदल झाल्याचं दिसून येतं. त्यांचे दोन्ही फोटो पाहता विश्वासच बसत नाही ते हेच चिमुकले आहेत. अशातच यामध्ये आणखी एका कलाकाराची भर पडली असून आणखी एका बॉलिवूड अभिनेत्याचा लहानपणीचा फोटो व्हायरल होत आहे. तुम्हीही या अभिनेत्याला ओळखलंत का?.

सध्या सोशल मीडियावर फिरत असलेला कलाकाराचा लहानपणीचा फोटो नक्की कोणाचा आहे?. समोर आलेल्या फोटोमध्ये शाहरुख खान आणि त्याच्या सोबत एक लहान मुलगा दिसत आहे. या फोटोमध्ये फॅन म्हणून हसत हसत फोटो काढलेलं मूल आज बी-टाऊनमधील प्रसिद्ध नाव आहे. पांढऱ्या टी-शर्टमध्ये फोटो काढलेल्य मुलाचा चेहरा पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की शाहरुख खानला भेटून त्याला किती आनंद झाला आहे. त्या मुलाच्या वडिलांनी हा फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा -  'सस्ती कंगना'; 'त्या' गोष्टीवरुन अंकिता लोखंडे होतेय ट्रोल, पुन्हा-पुन्हा पाहिला जातोय VIRAL VIDEO

शाहरुख खानसोबत दिसत असलेला हा लहानगा दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता विकी कौशल आहे. हा फोटो तेव्हाचा आहे तेव्हाचा आहे जेव्हा शाहरुख 'अशोका' चित्रपटाचे शूटिंग करत होता. हा फोटो स्टंट दिग्दर्शक आणि विकी कौशलचे वडील श्याम कौशल यांनी शेअर केला आहे. एकेकाळी चाहत्यासारखा फोटो काढणारा हा मुलगा एक दिवस मोठा कलाकार होईल आणि लोक त्याच्यासोबत फोटो काढायला एवढे उत्सुक असतील असं कोणालाही वाटलं नव्हतं.

दरम्यान, विकीचा हा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरतोय. विकीनं त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांचं मन जिंकलं असून आज त्याची गणना बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी केली जाते. विकीनं आपल्या मेहनतीच्या आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलंय.

First published:

Tags: Bollywood, Bollywood News, Vicky kaushal