आता कतरिना कैफला सोडून दीपिकासोबत रोमान्स करणार सलमान खान?

आता कतरिना कैफला सोडून दीपिकासोबत रोमान्स करणार सलमान खान?

अनेकदा संधी येऊनही काही कारणांमुळे त्यांची चर्चा विस्कटली आणि त्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीची वर्णी लागली.

  • Share this:

मुंबई, 8 मे- बॉलिवूडमध्ये एकदा तरी नावाजलेल्या अभिनेत्यासोबत आणि अभिनेत्रीसोबत बिग बजेट सिनेमा करायला मिळावा अशी प्रत्येक होतकरू कलाकाराची अपेक्षा असते. पण यात सलमान आणि दीपिका हे स्टार अपवाद ठरले. आतापर्यंत दोघांनी एकही सिनेमा एकत्र केलेला नाही. अनेकदा संधी येऊनही काही कारणांमुळे त्यांची चर्चा विस्कटली आणि त्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीची वर्णी लागली. पण आता दोन्ही स्टारच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मीडिया रिपोर्टनुसार लवकरच दोघं किक २ सिनेमात एकत्र येणार असं म्हटलं जात आहे.

किक २ सिनेमाचं चित्रीकरण लवकरच सुरू होणार असल्याचं म्हटलं जातंय. या सिनेमासाठी मेकर्स दीपिका पदुकोणला विचारत आहेत. या सिनेमासाठी सलमानसोबत आतापर्यंत ज्या अभिनेत्रींनी काम केलं त्यांच्याऐवजी वेगळ्या चेहऱ्याच्या शोधात होते. तसेच किक सिनेमासाठी जॅकलिन फर्नांडिस ही काही निर्मात्यांची पहिली निवड नव्हती. तेव्हाही दीपिकालाच या सिनेमासाठी विचारण्यात आले होते. पण काही कारणांमुळे गोष्टी जुळून न आल्यामुळे जॅकलिनची निवड करण्यात आली. पण यावेळी मात्र किकच्या सीक्ललसाठी निर्मात्यांना जाणीवपूर्वक दीपिकालाच घ्यायचे आहे.

‘मोदी तुम्ही तर पूर्णपणे मनातून उतरलात’, ट्वीटनंतर अभिनेता प्रियदर्शन जाधव झाला ट्रोल

बॉलिवूड हंगामाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ‘सलमानची एक अभिनेत्री एवढ्यापुरतीच दीपिकाला मर्यादित राहायचे नाहीये. सलमानप्रमाणेच तिच्या भुमिकेलाही वजन असणं आवश्यक आहे. साजिद सध्या यावर काम करत आहे.’ कलाकारांनाही या दोघांना मोठ्या पडद्यावर पाहायला नक्कीच आवडेल यात काही शंका नाही.

...म्हणून कतरीना म्हणते 'मला ट्विंकल खन्नाची भीती वाटते'

'डीएनए'ला दिलेल्या एका मुलाखतीत सलमान म्हणाला होता की, ‘दीपिकासोबत काम करायला मीही उत्सुक आहे.’ सध्या दीपिका मेट गालासाठी न्यूयॉर्कमध्ये गेली आहे. मुंबईत परतल्यानंतर ती छपाकच्या चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात करणार आहे. तर दुसरीकडे सलमान खानही त्याच्या बारत सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या सिनेमात त्याच्यासोबत कतरिना कैफ आणि दिशा पाटनीही दिसणार आहेत. येत्या ५ जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

SPECIAL REPORT : फॅशनच्या नावाने चांगभलं!

First published: May 8, 2019, 11:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading