मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सेम टू सेम! Kiara Advani ची कार्बन कॉपी असलेल्या त्या तरुणीची बॉलिवूडमध्ये एंट्री?

सेम टू सेम! Kiara Advani ची कार्बन कॉपी असलेल्या त्या तरुणीची बॉलिवूडमध्ये एंट्री?

अगदी कियारा आडवाणीसारखीच दिसणारी ही तरूणी एका रात्रीत प्रसिद्ध झाली आहे. ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे का? अशा चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

अगदी कियारा आडवाणीसारखीच दिसणारी ही तरूणी एका रात्रीत प्रसिद्ध झाली आहे. ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे का? अशा चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

अगदी कियारा आडवाणीसारखीच दिसणारी ही तरूणी एका रात्रीत प्रसिद्ध झाली आहे. ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे का? अशा चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

  मुंबई, 07 ऑक्टोबर : बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रीपैंकी एक कियारा आडवाणी  (Kiara Advani)आहे. कियारा नुकतीच शेरशाह (Shershaah) या सिनेमात दिसली होती. या सिनेमाने प्रेक्षक आणि समिक्षक दोघांकडून वाहवा मिळवली आहे. कियाराच्या भूमिकेचंही विशेष कौतुक झालं. दरम्यान या सिनेमातील गाण्यांवर अनेक चाहते रील्स-व्हिडीओ रिक्रिएट करत आहेत. इन्स्टाग्रामवर देखील एका तरूणीने असाच एक व्हिडिओ बनवला आहे. अगदी कियारासारखीच दिसणारी ही तरूणी एका रात्रीत प्रसिद्ध झाली आहे. या तरूणीचे नाव ऐश्वर्या सिंग आहे. ऐश्वर्या सिंग एक डेंटिस्ट आणि सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर आहे. इन्स्टाग्रामवर तिने शेअर केलेल्या रिल्सला सात लाखांहून अधिक लाईक्स आहेत. या रिल्समध्ये ती कियाराच्या शेहरशाह चित्रपटातील डिम्पलची भूमिका साकारताना दिसते आहे. तिच्याकडे पाहून ती कियाराचं आहे असं अनेक चाहत्यांनाच्या निदर्शनास अले आहे. लवकरचं ऐश्वर्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे का?, अशा चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत. वाचा :Tattoo दाखवण्यासाठी श्रुती हसन झाली Topless; जाणून घ्या काय आहे या शब्दाचा अर्थ दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि कियारा आडवाणीची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट ‘एमएस धोनी’ पाहिल्यानंतर ऐश्वर्या सिंगच्या मित्रांनी दिला दोघी एकसारख्या दिसत असल्याचं सांगितलं. एका मुलखतीत ती म्हणाली होती की, लोक तुम्हाला जेव्हा व्हायरल व्हिडिओवरून ओळखू लागतात, ते खूपच आश्चर्यकारक असते. अनेकांनी ऐश्वर्याला कियारा समजले आहे, ‘ट्रू कॉपी’, ‘डिट्टो’ असे देखील म्हटले आहे, असे तिने सांगितले. अभिनेत्री कियाराने देखील माझ्या एका व्हिडिओवर कमेट केली असल्याचे तिने सांगितले. वाचा :'ही' व्यक्ती आहे समंथा आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटचं कारण? जाणून घ्या सत्य यासोबतच ऐश्वर्या तिची इच्छा व्यक्त करत म्हणाली की, “कियाराला भेटणे हे माझे स्वप्नं आहे, ती खरंच एक उत्तम अभिनेत्री आहे आणि आम्ही लवकरच भेटू अशी अशा करते.” ऐश्वर्याने हे एक छंद म्हणून सुरू केले. तिला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ती लहान व्हिडिओ बनवते किंवा फोटो काढते. यासोबतच तिला शाळा आणि कॉलेजच्या दिवसांमध्ये फॅशन शो आणि नृत्याची आवड असल्याचे देखील तिने सांगितले.
  ऐश्वर्याला जेव्हा ती बॉलिवूडमध्ये येणार का?, असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ती म्हणाली, “मी याबद्दल विचार केला नाही, परंतु मी अजून स्वत:वर काम करत आहे. मी नवीन कंटेनट तयार करते आहे. लोकांसाठी मनोरंजक व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत आहे आणि कदाचित भविष्यात अभिनयाकडे वळणार असल्याचे देखील तिने सांगितले. त्यामुळे लवकरच ऐश्वर्या कियाराप्रमाणे बॉलिवू़डमध्ये झळकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bollywood actress, Bollywood News, Entertainment, Kiara advani

  पुढील बातम्या