Home /News /entertainment /

कियारा आडवाणीची सोशल मीडियावर धूम; नव्या गाण्यामुळे चाहते प्रेमात; पाहा VIDEO

कियारा आडवाणीची सोशल मीडियावर धूम; नव्या गाण्यामुळे चाहते प्रेमात; पाहा VIDEO

कियारा आडवाणीच्या 'इंदु की जवानी' (Indoo Ki Jawani) या चित्रपटाचं पहिलं गाणं 'हसीना पागल दीवानी' रिलीज झालं आहे.

    मुंबई, 16 सप्टेंबर :धोनी, कबीर सिंह या चित्रपटातून चाहत्यांच्या मनात घर करणारी बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) हिच्या आगामी 'इंदु की जवानी' (Indoo Ki Jawani) या चित्रपटाचं पहिलं गाणं 'हसीना पागल दीवानी' रिलीज झालं आहे. हे गाणं रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर धम्माल आली आहे. या गाण्यात कियारा आडवाणी धमाकेदार डान्स करीत असताना दिसत आहे. हे गाणं 'सावन में लग गई आग' चा रिमेक आहे. या गाण्यासाठी गायक मीका सिंहने (Mika Songh) आवाज दिला आहे. या गाण्यात निळ्या रंगाचा घागरा घातलेली कियारा नृत्य करीत असताना दिसत आहे. 15 सप्टेंबर रोजी हे गाणं रिलीज करण्यात आलं होतं. या गाण्याला आतापर्यंत 10 लाखांहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. कियारा आडवाणीचा सिनेमा 'इंदु की जवानी' जूनमध्ये रिलीज होणार होता. मात्र कोरोना व्हायरसच्या महासाथीमुळे सर्व चित्रपटांची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. अनेकांनी तर ओटीटी प्लॅटफॉर्मवरच चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय घेतला. हा चित्रपटदेखील ओटीटी प्लेटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. कियाराने मंगळवारी गाणं रिलीज होणार असल्याची घोषणा केली होती. यावेळी तिने मोशन पोस्टर शेअर केला होता. त्यात तिने लिहिलं होतं की, उद्या तर मज्जा येईल. तुम्हाला माहितीचं असेल याचं कारणं...नसेल तर जरा वाट बघा..हे गाणं रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर कियाराची मोठी चर्चा सुरू आहे. हे ही वाचा-बॉलिवूडमध्ये नवं नाट्य; जया बच्चन यांना पाठिंबा देण्यासाठी बिग बींची एन्ट्री वर्क फ्रंटवर कियारा आडवाणी वर्क फ्रंटबाबत सांगायचे झाल्यास कियाराने 2014 मध्ये 'फगली' चित्रपटापासून करिअरची सुरुवात केली होती, ती काही काळापूर्वी अक्षय कुमार, करीना कपूर खान आणि दिलजीत दोसांझसोबत 'गुड न्यूज' मध्ये होती. चित्रपट 'गिल्टी' मध्ये कियारा आडवाणी दिसली होती. आशिवाय अभिनेता अक्षय कुमारच्या लक्ष्मी बाँम्बमध्येही कियाराला पाहता येणार आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bollywood

    पुढील बातम्या