मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Kiara advani : कियाराच्या वाढदिवसानिमित्त सिद्धार्थनं दिली 'प्यार की झप्पी', VIDEO शेअर करत म्हणाला...

Kiara advani : कियाराच्या वाढदिवसानिमित्त सिद्धार्थनं दिली 'प्यार की झप्पी', VIDEO शेअर करत म्हणाला...

Kiara Advani and sidharth malhotra

Kiara Advani and sidharth malhotra

कियारा अडवाणीला अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानंही खास शुभेच्छा दिल्या आहेत. सिद्धार्थ आणि कियाराचं अफेअर असल्याच्या चर्चा खूपच चर्चेत आहेत. यातच सिद्धानं दिलेल्या खास शुभेच्छा चर्चेचा विषय ठरत आहे.

    मुंबई, 31 जुलै : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani Birthday)आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. आज कियाराचा 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने अभिनेत्रीवर सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच कियारा अडवाणीला अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानंही खास शुभेच्छा दिल्या आहेत. सिद्धार्थ आणि कियाराचं अफेअर असल्याच्या चर्चा खूपच चर्चेत आहेत. यातच सिद्धानं दिलेल्या खास शुभेच्छा चर्चेचा विषय ठरत आहे. अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धा मल्होत्रा यांचं अफेअर असल्याच्या चर्चा कायमच सोशल मीडियावर होत असतात. अशातच या चर्चांना आज पुन्हा तोंड फुटलं आहे. आज कियाराचा वाढदिवस असून सिद्धार्थनं एक क्युट व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकांउंटवर शेअर केला आहे. शुभेच्छा देत सिद्धार्थनं लिहिलं की, 'हॅपी बर्थ डे की, अशा अनेक BTS व्हिडीओ आणि मजेशीर व्हिडीओंसाठी चिअर्स, खूप सारं प्रेम आणि प्यार की झप्पी'. हेही वाचा -  Kiara Advani B'day: खरं नाव ते शिक्षण तुम्हाला माहितीयेत का कियारा अडवाणीच्या या खास गोष्टी? सिद्धार्थनं शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. त्यानं शेअर केलेल्या व्हिडीओ आणि कॅप्शनची जोरदार चर्चा रंगली आहे. यावर अनेक प्रतिक्रियाही उमटत आहे. दरम्यान, कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्या अफेअरच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत. मात्र आजतागायत दोघांनीही या प्रकरणी मौन सोडलेले नाही. कोणतीही अधिकृत घोषणा किंवा वक्तव्य याविशषयी केलेलं नाही. मात्र दोघेही सध्या कियाराचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दुबईला एकत्र गेल्याच्या चर्चा आहेत. कियाराचे नुकतेच दोन चित्रपट प्रदर्शित झाले. 'भूल भुलैया 2' या चित्रपटात ती कार्तिकसोबत दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला आहे. याशिवाय कियारा 'जुग जुग जिओ'मध्ये दिसली होती. या चित्रपटानेही चांगली कमाई केली आहे.
    Published by:Sayali Zarad
    First published:

    Tags: Birthday celebration, Bollywood, Bollywood actor, Kiara advani, Sidharth Malhotra

    पुढील बातम्या