मुंबई, 06 फेब्रुवारी: बॉलिवूडचं ऑनस्क्रिन कपल आता ऑफस्क्रिन देखील एकत्र येत आहेत. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी याचं शाही लग्न राजस्थानच्या जैसलमेर येथे होणार आहे. दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. नवरा नवरीसह सगळे पाहुणे लग्नाच्या ठिकाणी पोहोचलेत. दोघांच्या लग्नाच्या विधी देखील सुरू झाल्यात. 7 फेब्रुवारीला सिद्धार्थ कियाराचा लग्नसोहळा पार पडणार आहे. दोघांनाही नवरानवरीच्या रुपात पाहण्यासाठी त्यांचे चाहते आतुर झाले आहेत. दोघांमध्ये 8 वर्षांचं अंतर आहे. वयात अंतर असलं तरी कमाईच्या बाबतीत मात्र दोघेही एकमेकांना चांगलीच टक्कर देतात. सिद्धार्थ आणि कियारा यांचं नेटवर्थ, आलिशान घर, लग्झरी कार कलेक्शनचे सगळे डिटेल्स पाहूयात.
सिद्धार्थ आणि कियाराचं लग्न जैसलमेर मधील सूर्यगड पॅलेसमध्ये होणार आहे. 5 फेब्रुवारी पासून दोघांच्या लग्नाच्या विधींना सुरूवात झाली आहे. अभिनेता शाहिद कपूर, मीरा राजपूत आणि कियाराची खास मैत्रीण ईशा अंबानी जैसलमेरला पोहोचले आहेत.
कियाराचा जन्म 1992सालचा आहे. 2014मध्ये आलेल्या 'फगली' सिनेातून कियारानं करिअरला सुरूवात केली. बॉलिवूडमध्ये पदार्पण करून कियाराला 8 वर्ष झाली आहे. 8 वर्षात तिनं 'कबीर सिंह', 'एम.एस.धोनी:द अनटोल्ड स्टोरी', 'लक्ष्मी', 'गुड न्यूज', 'लस्ट स्टोरी', 'कलंक', 'गिल्ट', 'शेरशाह', 'इंदु की जवानी', 'भुलैया 2' सारख्या हिट सिनेमात काम केलं आहे. 'एम.एस.धोनी:द अनटोल्ड स्टोरी' हा सिनेमा कियाराच्या करिअरमधील एक टर्निंग पॉइंट ठरला. तर शेरशाह सिनेमात सिद्धार्थ आणि तिची लव्हस्टोरी सुरू झाली.
सिद्धार्थ आणि कियारा लग्नासाठी लाखो रुपये खर्च करत आहेत. दोघांनी बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. दोघांची एकूण संपत्ती एकून सर्वांच्याच भुवया उंचावतील. मीडिया रिपोर्टनुसार, कियाराची एकूण संपत्ती 3 मिलियन डॉलर इतकी आहे. कियाराकडे मर्सडीज बेंज E220D ही कार आहे. ज्याची किंमत 60 लाख रुपये आहे. त्याचप्रमाणे तिच्याकडे एक BMWदेखील आहे. कियाराचं मुंबईतील स्वत:चं घर 15 कोटी रुपयांचं आहे.
सिद्धार्थ विषयी सांगायचं झालं तर सिद्धार्थचा जन्म 16 जानेवारी 1985 साली दिल्लीत झालाय. सिद्धार्थ हा पंजाबी असून 'स्टुन्डट ऑफ द इअर' या सिनेमातून त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'एक विनल', 'शेरशाह', 'मिशन मजनू', 'ब्रदर्स', 'कपूर अन्ड सन्स', 'बार बार देखो', 'इत्तेफाक', 'जबरिया जोडी', 'मरजावा' सारख्या सिनेमात त्यानं काम केलं आहे.
सिद्धार्थ देखील संपत्तीच्या बाबतीत करोडपती आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थची एकूण संपत्ती 80 कोटी इतकी आहे. मुंबईच्या वांद्रे येथे त्याचा आलिशान बंगला आहे. सिद्धार्थ महागड्या गाड्यांचा शॉकिन आहे. त्याच्याकडे लँड रोवर वोग, हार्ले-डेविडसन फॅट बॉय आणि मर्सिडिज मेबॅक s500 या कार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News