बॉलिवूडमध्ये येण्याआधी अभिनेत्री करायची बेबी सीटरचं काम, बदलले होते डायपर्स

बॉलिवूडमध्ये येण्याआधी अभिनेत्री करायची बेबी सीटरचं काम, बदलले होते डायपर्स

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या अभिनेत्रीनं तिच्या पहिल्या नोकरीविषयीचा खुलासा केला.

  • Share this:

मुंबई, 07 डिसेंबर : बॉलिवूडमध्ये दरवर्षी नवे चेहरे येतात. काही लोक यशस्वी ठरतात. तर काहींना मात्र काही दिवसांतच आपला गाशा गुंडाळावा लागतो. सध्याच्या स्टार किड्सच्या जमान्यात आउट साइडर कलाकारांना बराच घाम गाळावा लागतो. अशीच एक अभिनेत्री म्हणजे कियारा अडवाणी. कबीर सिंह सिनेमाच्या यशानंतर कियारकडे सध्या सिनेमांची रांग लागली आहे. लवकरच तिचा ‘गुड न्यूज’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी कियारा नोकरी करत असे. ‘गुड न्यूज’ सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत कियारानं या गोष्टीचा खुलासा केला.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कियारानं ती सिनेमात येण्याआधी ती काय काम करायची याविषयी सांगितलं. बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत कियारानं बॉलिवूडमध्ये येण्याआधी ती लहान मुलांना सांभाळण्याचं काम करत असे याचा खुलासा केला. ती म्हणाली, माझ्या आईचं एक प्री स्कूल होतं. बॉलिवूडमध्ये येण्याआधी माझा पहिली नोकरी मी आईच्या स्कूलमध्ये केली होती. तिथे मी सकाळी 7 वाजता जात असे आणि लहान मुलांची देखभाल करत असे.

काय आहे बिपाशा बासूच्या हॉट फिगरचं रहस्य, घ्या जाणून

 

View this post on Instagram

 

#GoodNewwz

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

कियारा पुढे सांगते, ‘मी लहान मुलांना सांभाळायची सर्व काम केली आहेत. मी नर्सरीमध्ये कविता म्हणत असे, त्यांना अल्फाबेट्स आणि नंबर्स शिकवत असे. मी त्यांचे डायपर्स सुद्धा चेंज केले आहेत. मला लहान मुलं फार आवडतात.’ कियारा म्हणते मी एक दिवस आई होईन माझं बाळ असेल आणि हा जीवनातला सर्वात सुंदर क्षण असतात.

हृतिक रोशन करणार होता 6 व्या बोटाचं ऑपरेशन, पण...

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

कियाराच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर तिचा ‘गुड न्यूज’ 27 डिसेंबरला रिलीज होत आहे. करण जोहरची निर्मिती असलेल्या या सिनेमात कियारासोबतच अक्षय कुमार, करिना कपूर, दिलजीत दोसांझ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय कियारा अक्षय कुमार सोबत 'लक्ष्मी बॉम्ब' या सिनेमात दिसणार आहे.

'त्याला सोडणार नाही', NUDE PHOTO व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्रीने दिला इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Bollywood
First Published: Dec 7, 2019 12:12 PM IST

ताज्या बातम्या