मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Kiara-Sidharth: कियारा 'या' दिवशी करणार सिद्धार्थसोबत लग्नाची घोषणा? 'त्या' पोस्टमुळे चर्चेला उधाण

Kiara-Sidharth: कियारा 'या' दिवशी करणार सिद्धार्थसोबत लग्नाची घोषणा? 'त्या' पोस्टमुळे चर्चेला उधाण

सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणी

सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणी

अभिनेत्री कियारा अडवाणीची एक पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या पोस्टचं सिद्धार्थ मल्होत्राशी नक्की काय कनेक्शन आहे पाहा

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 27 नोव्हेंबर :  बॉलिवूड मध्ये सध्या एका जोडप्याच्या लग्नाच्या बातम्यांनी जोर धरला आहे. ते जोडपं म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी. कॉफी विथ करणमध्ये या दोघांनी केलेल्या खुलास्यानंतर आता  या जोडप्याच्या लग्नाची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. दोघेही येत्या डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याच्या बातम्या सध्या समोर येत आहेत. दरम्यान, आता कियारा अडवाणीने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने लवकरच एक मोठी घोषणा करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कियाराच्या या पोस्टनंतर पुन्हा एकदा तिच्या आणि सिद्धार्थच्या लग्नाची चर्चा जोरदार सुरू झाली आहे.

कियारा अडवाणीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये कियारा तिची सुंदर स्टाईल दाखवत आहे. हा व्हिडिओ काही सेकंदांचा आहे पण अभिनेत्रीची झलक पाहण्यासारखी आहे. या व्हिडीओसोबत कियाराने कॅप्शनमध्ये लिहिले की, ''मी खूप वेळ मनात कुठली गोष्ट लपवून ठेवू शकत नाही....तुम्हाला येत्या २ डिसेंबरला सांगणार आहे.. तोपर्यंत माझ्यासोबत राहा!''

हेही वाचा - Nora Fatehi :नोराने पहिल्यांदा सांगितली ब्रेकअप स्टोरी; त्याच्या आठवणीत स्टेजवरच ढसाढसा रडली

कियाराची ही पोस्ट सोशल मीडियावर वणव्यासारखी व्हायरल झाली या आहे. सिद्धार्थ आणि कियाराचे चाहते आता अभिनेत्री तिच्या लग्नाची घोषणा करणार असल्याचा अंदाज लावत आहेत. अनेकांनी तर कमेंट सेक्शनमध्ये म्हटलं की तू लग्न करणार असल्याची घोषणा करणार असशील तर ते सगळ्यांना माहित आहे...काहीतरी नवीन सांग' तर  आणखी एका यूजरने लिहिले, 'किनारा लग्न करणार ही घोषणा आहे. तू सिद्धार्थशी लग्न करणार आहेस. आम्हाला माहित आहे.' अशाच प्रकारच्या कमेंट अनेक चाहत्यांनी देखील केल्या आहेत. कियाराच्या या पोस्टवर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे.

View this post on Instagram

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी या दोघांच्या नात्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. मात्र, दोघांनीही ते कधीच उघडपणे स्वीकारले नाही. यानंतरही चाहत्यांकडून दोघांच्या लग्नाचा अंदाज लावला जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​पुढील वर्षी एप्रिलमध्ये दिल्लीत फक्त कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न करणार आहेत. कियारा आणि सिद्धार्थ पुढच्या वर्षी लग्न करणार असल्याची माहिती दोघांच्या जवळच्या सूत्राने दिली आहे. तर काही दिवसांपूर्वी चंदीगढमध्ये लग्नासाठी स्थळ बुक केलं आहे अशा बातम्याही येत होत्या. आता लवकरच ही माहिती खरी होवो आणि दोघे लग्न करोत अशी आशा चाहते करत आहेत.

दोघांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, कियारा लवकरच आरसी 15 आणि 'सत्यप्रेम की कथा' सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याशिवाय सिद्धार्थ मल्होत्राचा 'थँक गॉड' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. तर येणाऱ्या काळात तो 'मिशन मजनू' हा चित्रपट आणि रोहित शेट्टीच्या ;इंडियन पुलिस फोर्स' या वेब सिरीजमध्ये दिसणार आहे.

First published:

Tags: Bollywood News, Kiara advani, Sidharth Malhotra