मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Kiara Advani: लग्नामध्ये कियारा आडवाणीला वधूपक्षात हवीय सिद्धार्थची X-गर्लफ्रेंड;अभिनेत्रीचा अजब हट्ट

Kiara Advani: लग्नामध्ये कियारा आडवाणीला वधूपक्षात हवीय सिद्धार्थची X-गर्लफ्रेंड;अभिनेत्रीचा अजब हट्ट

करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' चा सातवा सीजनसुद्धा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये सतत बॉलिवूड सेलिब्रेटी आपल्या खाजगी आयुष्याबाबत खुलासे करताना दिसून येत आहेत.

करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' चा सातवा सीजनसुद्धा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये सतत बॉलिवूड सेलिब्रेटी आपल्या खाजगी आयुष्याबाबत खुलासे करताना दिसून येत आहेत.

करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' चा सातवा सीजनसुद्धा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये सतत बॉलिवूड सेलिब्रेटी आपल्या खाजगी आयुष्याबाबत खुलासे करताना दिसून येत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 25 ऑगस्ट-   करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' चा सातवा सीजनसुद्धा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये सतत बॉलिवूड सेलिब्रेटी आपल्या खाजगी आयुष्याबाबत खुलासे करताना दिसून येत आहेत. बॉलिवूडमधील सर्वात चर्चित कपल्सपैकी एक कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी या शोमध्ये काहीप्रमाणात आपल्या नात्याची कबुली दिली आहे. नुकतंच या दोघांनी वेगवेगळ्या एपिसोडमध्ये हजेरी लावली होती. दरम्यान कियारा आडवाणीनं आपल्या लग्नाबाबत अशी काही इच्छा बोलून दाखवली की सर्वच चकित झाले आहेत.

'कॉफी विथ करण'च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये बॉलिवूडचे 'प्रीती-कबीर' अर्थातच अभिनेत्री कियारा आडवाणी आणि शाहिद कपूर यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी करण आणि शाहिदने कियारा आडवाणीसोबत बरीच मजामस्ती केली. या दोघांनी सिद्धार्थच्यासोबतच्या नात्याबाबत बोलण्यासाठी कियाराला बरेच आढेवेढे प्रश्न विचारले होते. हा एक मजेदार एपिसोड होता. यामध्ये कियारा आडवाणीनेसुद्धा काही प्रमाणात आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केला आहे. यापूर्वी सिद्धार्थ मल्होत्रा आणि विकी कौशल या शोमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळीही विकी आणि करणने सिद्धार्थला त्यांच्या नात्याबाबत बोलण्यास भाग पाडलं होतं. आणि सिद्धार्थने काहीशे आडफाटे घेत आपलं नातं कबुल केलं होतं.

दरम्यान कियारा आडवाणीने आपल्या लग्नाबाबतही संवाद साधला. यावेळी अभिनेत्रीनं म्हटलं, 'मी लग्नव्यवस्थेवर नेहमीच विश्वास ठेवला आहे. मी माझ्या घरात अनेक सुंदर लग्न पाहिली आहेत. त्यामुळे मीसुद्धा आयुष्यात लग्न करु इच्छिते. परंतु माझ्या लग्नाचे प्लॅन्स मी या शॉवर अजिबात उघड करणार नाहीय. परंतु लग्नामध्ये तुम्हा सर्वांना नक्कीच आमंत्रण असणार. या एपिसोडमध्ये रॅपिड फायरवेळीसुद्धा कियाराने अनेक रंजक खुलासे केले आहेत. यावेळी करणने कियाराला विचारलं होतं, 'तुला तुझ्या लग्नात वधूपक्षात कोणती अभिनेत्री पाहायला आवडेल?' यावर पटकन उत्तर देत कियाराने म्हटलं मला आलिया भट्टला पाहायला आवडेल. ती फारच गोंडस आणि चांगली आहे. माझं तिच्यावर प्रचंड प्रेम आहे'.

(हे वाचा:Pushpa 2 मध्ये रश्मिका मंदानाची दमदार भूमिका; समोर आली चित्रपटाबाबत मोठी अपडेट )

कियाराच्या या उत्तरानंतर चाहते मात्र चकित झाले आहेत. कारण आलिया भट्ट ही सिद्धार्थ मल्होत्राची एक्स गर्लफ्रेंड आहे. सिद्धार्थ आणि आलियाने बराच काळ एकमेकांना डेट केलं आहे. या दोघांनी करण जोहरच्या 'स्टुडन्ट ऑफ द ईयर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटानंतरच ते एकमेकांच्या जवळ आले होते. आणि त्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये आल्याचं म्हटलं जातं. मात्र काही वर्षांपूर्वी या दोघांचा ब्रेकअप झाला होता.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood News, Entertainment, Kiara advani, Sidharth Malhotra