कबीर सिंगनंतर अर्जुन रेड्डी झाला कियाराचा चाहता, म्हणाला...

Kabir Singh | Shahid Kapoor | Kiara Advani | या सिनेमात कियाराच्या नो मेकअप लुकनं प्रेक्षकांची मनं जिंकली.

News18 Lokmat | Updated On: Jun 29, 2019 06:53 PM IST

कबीर सिंगनंतर अर्जुन रेड्डी झाला कियाराचा चाहता, म्हणाला...

मुंबई, 29 जून : अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या खूप खुश आहे. कियाराची मुख्य भूमिका असलेला सिनेमा कबीर सिंग सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. कियारा आणि शाहिद सध्या हे यश एंजॉय करत आहेत. चाहत्यांव्यतिरिक्त सिने इंडस्ट्रीतील अनेक व्यक्ती कियारा आणि शाहिदचं कौतुक करत आहेत. ज्यात फक्त बॉलिवूडकरच नाही तर दाक्षिणात्य कलाकारांचाही समावेश आहे.

शाहरुख खानची लेक सुहाना झाली ग्रॅज्यूएट, मिळाला 'हा' खास पुरस्कार

कबीर सिंग हा सिनेमा तेलुगू ब्लॉकबास्टर सिनेमा अर्जुन रेड्डीचा ऑफिशियल हिंदी रिमेक आहे. तेलुगू सिनेमामध्ये विजय देवरकोंडानं साकरलेली भूमिका कबीर सिंगमध्ये शाहिदनं साकारली तर कियारानं शालिनीची भूमिका साकारली. या सिनेमात कियाराच्या नो मेकअप लुकनं प्रेक्षकांची मनं जिंकली. यात फक्त तिचे चाहतेच नाही तर आता खुद्द अर्जुन रेड्डी म्हणेजच विजय देवरकोंडाचाही समावेश झाला आहे. विजय कियाराच्या अभिनयावर एवढा इम्प्रेस झाला की त्यानं तिच्यासाठी खास गिफ्ट आणि हँडरिटन नोट पाठवली आहे. याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत कियारानं त्याचे आभार मानले आहेत.

World Cup- स्पृहाने विराटची डोकेदुखी केली दूर!

Loading...

विजयनं नोटमध्ये लिहिलं, ‘कियारा कबीर सिंगच्या यशाच्या शुभेच्छा. हे सर्व खूप एंजॉय कर. मी माझ्या क्लोदिंग लाइन मधील बेस्ट कपडे पाठवत आहे.’

दीपिकानं सांगितलं ‘83’मध्ये रणवीरच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारण्याचं कारण

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

 

View this post on Instagram

 

Arjun sends you love Preethi @kiaraaliaadvani ☺ Can't wait to see #KabirSingh!

A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda) on

शाहिदनं साकारलेली 'कबीर सिंह' ही भूमिका अग्रेसिव्ह, लाउड आणि स्ट्रॉन्ग दाखवण्यात आली आहे. याशिवाय कियारा अडवाणी साधा लुक प्रेक्षकांना भावला. आतापर्यंत या सिनेमानं 146.63 कोटी रुपये एवढी कमाई केली आहे. रोमँटिक ड्रामा असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शिन संदिप वांगा यांनी केलं आहे.

==================================================================

SPECIAL REPORT : 'नासा' खरंच कृत्रिम ढगांची निर्मिती करणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2019 06:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...