‘कबीर सिंहमधील हिरोची भूमिका चुकीची’ अभिनेत्री कियारा अडवाणीची प्रतिक्रिया

‘कबीर सिंहमधील हिरोची भूमिका चुकीची’ अभिनेत्री कियारा अडवाणीची प्रतिक्रिया

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कियारानं कबीर सिंहची भूमिका चुकीची असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 24 जानेवारी : कबीर सिंह हा सिनेमा 2019 मधला सर्वाधिक चर्चेत राहिलेला सिनेमा ठरला. या सिनेमाला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं पण या सिनेमावरुन बरेच वादही झाले. बॉक्स ऑफिसवर या सिनेमानं तगडा गल्ला जमवला असला तरीही समीक्षकांनी या सिनेमातील कबीर सिंह या व्यक्तिरेखेवर बरीच टीका केली होती. या सिनेमावरुन प्रेरणा घेतल्यानं देशभरात बरेच गुन्हे सुद्धा घडल्याच्या घटना घडल्या होत्या. यावर सिनेमाचे दिग्दर्शक आणि अभिनेता शाहिद कपूरनं प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता सिनेमाची अभिनेत्री कियारा अडवाणी हिनं सुद्धा आपलं मत मांडलं आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कियारानं कबीर सिंहची भूमिका चुकीची असल्याची धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. कियारा म्हणाली, या सिनेमातील कबीर सिंहची व्यक्तीरेखा अनेक दृष्टीकोनातून चुकीची होती. पण माझ्यासाठी हे एक काल्पनिक पात्र आहे. अर्थात हा सिनेमा माझ्या करिअर मधील सर्वात महत्त्वाचा सिनेमा आहे.

कसा आहे कंगनाचा ‘पंगा’, सिनेमाचा बघायला जाण्याआधी वाचा Public Review

 

View this post on Instagram

 

🌸 @amanbhakriphotography @ekalakhani @akankshagajria @mahesh_notandass

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

कियारा पुढे म्हणाली, ‘या सिनेमामुळे मला बरीच लोकप्रियता मिळाली. मला खरं तर याची आधी कल्पना नव्हती. पण जेव्हा मी गुड न्यूजच्या प्रमोशनसाठी चंदीगढला गेले होते त्यावेळी आमचा इव्हेंट एका कॉलेजमध्ये होता. मी जेव्हा तिथे एंट्री केली त्यावेळी तिथले सर्वजण प्रीती प्रीती म्हणून ओरडत होते. त्यावेळी मी लोकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली आहे याची मला पहिल्यांदा कल्पना आली.’

बॉलिवूड डेब्यूआधीच चर्चेत आहे सैफची ऑनस्क्रीन मुलगी, पाहा तिचे HOT PHOTOS

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

कियाराच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर तिच्याकडे सध्या ‘लक्ष्मी बॉम्ब’, ‘इंदू की जवानी’, ‘शेरशाह’ आणि ‘भुलभुलैय्या 2’ हे सिनेमा आहेत. तर दुसरीकडे शाहिद कपूर त्याचा आगामी सिनेमा जर्सीच्या शूटिंगमध्ये बीझी आहे. कबीर सिंहनंतर शाहिदला बरीच प्रसिद्धा मिळाली. या सिनेमानंतर त्यानं त्याच्या मानधनातही वाढ केली आहे.

रानू मंडलच्या Viral Video वर हिमेश रेशमियानं पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Bollywood
First Published: Jan 24, 2020 05:11 PM IST

ताज्या बातम्या