‘लस्ट स्टोरी’च्या व्हायब्रेटर सीनसाठी कियारा अडवाणीनं अशी केली होती तयारी

‘लस्ट स्टोरी’च्या व्हायब्रेटर सीनसाठी कियारा अडवाणीनं अशी केली होती तयारी

एका चॅट शोमध्ये दिलेल्या मुलाखतीत कियारानं हा सीन शूट कसा शूट करण्यात आला आणि या सीनसाठी तिनं कशी तयारी केली याविषयी सांगितलं.

  • Share this:

मुंबई, 16 जून : नेटफ्लिक्स वरील लोकप्रिय वेब सीरिज लस्ट स्टोरीमधील अभिनेत्री कियारा अडवाणीच्या व्हायब्रेटर सीनची खूप चर्चा झाली होती. मात्र हा सीन शूट करण्यासाठी कियाराला खूप मेहनत घ्यावी लागली होती. नुकत्याच एका चॅट शोमध्ये दिलेल्या मुलाखतीत कियारानं हा सीन शूट कसा शूट करण्यात आला आणि या सीनसाठी तिनं कशी तयारी केली याविषयी सांगितलं. तसेच या सीनच्या शूटिंगच्या वेळी आपण खूपच नर्व्हस होतो हे सुद्धा कियारानं यावेळी स्पष्ट केलं.

IND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यासाठी शाहरुखने घेतले खास टीशर्ट

 

View this post on Instagram

 

To the ones that you don't see in the picture 🙌🏼 -->@taras84 @makeupbylekha @pompyhans @jubindesai @sanamratansi 😘📸

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

आगामी सिनेमा ‘कबीर सिंह’च्या प्रमोशनसाठी कियारा आणि शाहिद कपूर यांनी नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी तिला लस्ट स्टोरी मधील व्हायब्रेटर सीन कॅमेरावर एवढा चांगला कसा काय शूट करण्यात आला असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना कियारा म्हणाली, ‘करण जोहरनं मला हा सीन कसा करायचा हे सांगितलं होतं. त्याला वाटत होतं की, मी हा सीन न घाबरता करावा. त्यानं मला हे सुद्धा सांगितलं की, स्क्रीनवर या सीन लहान भाग दाखवण्यात येणार आहे. मी या सीनवर हसू नये असं त्याला वाटत होतं. पण हा सीन शूट करण्याआधी मी खूप नर्व्हस होते. हा सीन शूट करण्याआधी मी खरं तर व्हायब्रेटरचा वापर कसा करतात हे गुगलवर सर्च केलं होतं. हे काय आहे हे समजून घेण्यासाठी मी ‘द अगली ट्रूथ’ सारख्या सिनेमांमधील काही सीन पाहिले.’

पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो

कियारानं यावेळी करणनं दिलेल्या सल्ल्यांविषयीही सांगितलं. ती म्हणाली, ‘करणनं मला हा सीन प्रामाणिकपणे करण्याचा सल्ला दिला होता.’ लस्ट स्टोरीमध्ये कियारानं विक्की कौशलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. सध्या कियारा तिचा आगामी सिनेमा कबीर सिंहच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमामध्ये ती शाहिद कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन संदीप वांगा यांनी केलं असून हा सिनेमा साउथ ब्लॉकबास्टर सिनेमा अर्जुन रेड्डीचा हिंदी रिमेक आहे. येत्या 21 जूनला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

पाकविरुद्ध वक्तव्य करून चर्चेत राहिले हे 5 सेलिब्रिटी

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

First published: June 16, 2019, 6:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading