मुंबई, 07 फेब्रुवारी : बॉलिवूडच्या बहुचर्चित अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचं अखेर लग्न लागलं. जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये सिद्धार्थ आणि कियारा विवाहबद्ध झाले. दोघांचा शाही विवाह सोहळा रंगला. 4-5 दिवसांपासून दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी करण्यात आली होती. बॉलिवूड सेलिब्रेटींसह अनेक दिग्गज मंडळी सिद्धार्थ कियाराच्या लग्नाला उपस्थित होती. दोघांच्या लग्नाची चाहते आतूरतेनं वाट पाहत होते. ANI नं दोघांच्या लग्नाची अधिकृत घोषणा केली आहे.
सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाची मागचे महिनाभर प्रचंड चर्चा सुरू होती. दोघांनाही नवरा नवरीच्या वेशात पाहण्यासाठी सगळेच उत्साही होते. मात्र लग्न लागून 5 तास झाले तरी दोघांच्या लग्नाचा एकही फोटो समोर आलेल नाही. दोघांच्या लग्नाचे फोटो आता येतील नंतर येतील असं म्हणत चाहत्यांची उत्सुकता शिगेला ताणली. मात्र रात्र झाली तरी लग्नाचा एकही फोटो न दिसल्यानं नेटकऱ्यांनी मात्र दोघांवर चांगलाच निशाणा साधलाय.
It's official! Sidharth Malhotra, Kiara Advani are now married
Read @ANI Story | https://t.co/9hhnWRlasN#SidharthMalhotra #KiaraAdvani #SidKiara #BollywoodWedding pic.twitter.com/7W2HMe7ayK — ANI Digital (@ani_digital) February 7, 2023
ट्विटवर मिसेस मल्होत्रा असा हॅशटॅग ट्रेंड होत असला तरी त्यावर दोघांचा एकही फोटो नाहीये. कियारानं लग्नात नेमका कसा लुक केला होता? कोणते दागिने घातले? लग्नाचा थाटमाट नेमका कसा होता? लग्नाला कोण कोण आलं होतं? हे सगळं पाहण्यासाठी चाहते आतूर होते मात्र दोघांच्या लग्नाचे फोटोच न आल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ट्विटवर नेटकऱ्यांनी अनेक ट्विट करत दोघांना निशाणा केलं आहे.
agle saal anniversary pe aayengi shayad pics 👍
— !¡ (@anamfied) February 7, 2023
पुढच्या वर्षी अॅनिवर्सरिला लग्नाचे फोटो येणार, असं मजेशीर ट्विट एका युझरनं केलं आहे. तर सिड- कियाराला ब्लॉक करा आणि पुढे चला, असंही एका युझरनं म्हटलंय.
block sid-kiara and move on
— sarah`ˢᶦᵈᵏᶦᵃʳᵃʷᵃˡᵉ (@sidxjk) February 7, 2023
सिद्धार्थ कियाराच्या लग्नात मुलाकडच्या लोकांनी पिंक रंगाचे कपडे घातले होते तर मुलीकडच्या लोकांनी गोल्डन कलरचे कपडे घातले होते, अशी माहिती कार्यक्रमात काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी दिली आहे. मोठ्या धुमधडाक्यात सिद्धार्थ आणि कियाराचं लग्न झालं.
राजस्थानच्या जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसवरील सिद्धार्थ कियाराच्या लग्नासाठी लक्झरी व्हिला बुक करण्यात आला होता. या व्हिलामध्ये तब्बल 84 खोल्यांचं बुकिंग करण्यात आलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News