Home /News /entertainment /

श्रीदेवीची दुसरी मुलगीही पडद्यावर येणार; जान्हवीनंतर खुशीविषयी बोनी कपूर यांनी दिली बातमी

श्रीदेवीची दुसरी मुलगीही पडद्यावर येणार; जान्हवीनंतर खुशीविषयी बोनी कपूर यांनी दिली बातमी

'म्हणून मी माझ्या मुलीला लाँच केलं नाही....' वडील बोनी कपूर यांनी मुलीच्या पदार्पणाविषयी बोलताना नेपोटिझमबद्दलही मत व्यक्त केलं आहे.

मुंबई, 19 जानेवारी: दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) आणि निर्माता बोनी कपूरची (Boney Kapoor) मोठी मुलगी जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. खूपच कमी कालावधीत तिने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. याचबरोबर तिची लहान बहीण  खुशी कपूर (Khushi Kapoor) देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे मोठ्या प्रमाणात चाहते असून लवकरच खुशी कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे खुद्द बोनी कपूर (Boney Kapoor)  यांनी सांगितले आहे.

ई-टाईम्सशी बोलताना जेव्हा बोनी कपूर (Boney Kapoor) यांना खुशीच्या बॉलिवूडमध्ये पदार्पणाविषयी विचारलं गेलं तेव्हा त्यांनी, हो खुशी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून आपल्याला लवकरच तिच्या चित्रपटाबद्दल ऐकायला मिळेल असं म्हटलं. परंतु त्यांचे प्रॉडक्शन हाऊस खुशीला लाँच करणार नसल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जान्हवी आणि अर्जुन कपूर यांनादेखील बोनी कपूरच्या प्रॉडक्शन हाऊसने बॉलिवूडमध्ये लाँच केलं नव्हतं. त्यामुळे तिला दुसरे कुणी बॉलिवूडमध्ये संधी दिल्यास ती माझ्यासाठी खूप अभिमानाची आणि सुरक्षिततेची भावना आहे. बॉलिवूडमधील नेपोटिझम वादाबाबत बोलताना बोनी कपूर म्हणाले की, खरंतर कुणीतरी खुशीला लाँच करावं या प्रयत्नात मी होतो. कारण, माझ्याकडे चित्रपट निर्मितीचा अनुभव आणि यंत्रणा असली तरीही मी वडील म्हणून तिच्या पदार्पणासाठी मदत केली असा आरोप माझ्यावर होऊ शकतो. हे वाचा - जान्हवीनं केलं बहीण खुशीच्या चेहऱ्यावर पेंटिंग, VIDEO पाहिल्यावर पोट धरून हसाल ज्या पद्धतीने संजय (Sanjay Kapoor) आणि अनिलने (Anil Kapoor) बॉलिवूडमध्ये आपलं स्वतःच स्थान निर्माण केलं त्याच पद्धतीने खुशीनेदेखील आपलं स्वतःच स्थान निर्माण करावं अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. यामुळे आता लवकरच आपल्याला ख़ुशी देखील बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे. याचबरोबर  बोनी कपूर यांनीही अभिनयाच्या जगात पदार्पण केलं आहे. नुकतेच ते  अनिल कपूरच्या AK Vs AK मध्ये दिसले होते आणि आता रणबीर आणि श्रद्धा कपूरच्या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. लव रंजन या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटात ते रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारणार असून मुलांच्या आग्रहाखातर त्यांनी अभिनयात येण्याचं ठरवल्याचं म्हटलं.
Published by:news18 desk
First published:

Tags: Bollywood, Bollywood News, Janhavi kapoor

पुढील बातम्या