S M L

VIDEO- काँग्रेसच्या रॅलीत चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणाऱ्याला अभिनेत्रीने भर रस्त्यात मारले

असे काही झाले की खुशबू रागाने लालबुंद झाल्या आणि त्यांनी एका व्यक्तिच्या कानशिलात लगावली.

Updated On: Apr 13, 2019 12:00 PM IST

VIDEO- काँग्रेसच्या रॅलीत चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणाऱ्याला अभिनेत्रीने भर रस्त्यात मारले

कर्नाटक, १३ एप्रिल- सध्या देशभरात निवडणुकांचे वारे वाहताना दिसत आहेत. याच संदर्भातला एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एक प्रसिद्ध नेता अज्ञात व्यक्तिला कानशिलात लगावताना दिसत आहे. हा व्हिडीओ आहे अभिनेत्री आणि काँग्रेस नेता खुशबू सुंदर यांचा. नुकतेच बंगळुरू सेंट्रल येथून उभ्या राहिलेल्या खुशबू या आपल्या पक्षासाठी प्रचार करत होत्या. दरम्यान, त्यांच्यासोबत असे काही झाले की खुशबू रागाने लालबुंद झाल्या आणि त्यांनी एका व्यक्तिच्या कानशिलात लगावली.

आपली प्रचार सभा संपवून खुशबू सुंदर या परत घरी जात होत्या. त्यांना पाहण्यासाठी प्रचंड लोक जमा झाले होते. त्याचवेळी गर्दीचा फायदा उचलत एका व्यक्तिने खुशबू यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा खुशबू यांना याची जाणीव झाली तेव्हा त्या लगेच वळल्या आणि अश्लील चाळे करणाऱ्याच्या कानशिलात लगावली. यानंतर त्या व्यक्तिला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.




या घटनेबद्दल खुशबू यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. पण त्यांचा कानशिलात लगावताचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. खुशबूचे चाहते तिला पाठिंबा देताना दिसत आहेत.

खुशबू यांनी ‘अन्नामलाई’ (१९९२) आणि ‘जानू’ (१९८५) यांसारख्या हिट सिनेमात काम केलं आहे. या सिनेमातील त्यांची भूमिका अजूनही कोणी विसरलेलं नाही. आपल्या अफलातून करिअरमध्ये खुशबू यांनी २०० हून अधिक सिनेमांत काम केलं असून २०१४ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. तमिळ सिनेमांशिवाय खुशबू यांनी हिंदी सिनेमांतही काम केलं आहे. ‘द बर्निंग ट्रेन’ मध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून काम केलं होतं. याशिवाय ‘नसीब’, ‘लावारिस’, ‘कालिया’, ‘दर्द का रिश्ता’, ‘बेमिसाल’ यांसारख्या हिट सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

Loading...


VIDEO : सुजय विखे पाटलांबद्दल अजित पवारांचा गौप्यस्फोट


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 13, 2019 11:18 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close