मुंबई, 12 मार्च : कलर्स टीव्हीवर सुरू असलेला खतरों के खिलाडीचा 10 वा सीझन यंदा खूपच चर्चेत आहे. या शोमधील स्पर्धक तेजस्वी प्रकाश नेहमीच चर्चेचा विषय ठरते. अनेकदा रोहित शेट्टी तिची खिल्ली उडवताना दिसतो. पण या शोचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात रोहित शेट्टी तेजस्वीवर भडकलेला पाहायला मिळाला. एवढंच नाही तर त्यानं तिला आता तुझ्या मर्यादेत राहा असा सल्लाही देऊन टाकला आहे.
खतरों के खिलाडी या शोचा नवा प्रोमो कलर्स टीव्हीच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यात रोहित तेजस्वीवर भडकलेला दिसला मात्र आता यामागचं खरं कारण स्पष्ट झालं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार तेजस्वीनं रोहितवर भेदभाव केल्याचा आरोप केला होता. रोहित सर अमृता खानविलकरला नेहमी सूट देतात. कारण तिचे पाय जळले आहेत. तेजस्वीनं असं मस्करीत म्हटलं असलं तरीही रोहितला तिचं बोलणं आवडलं नाही ज्यामुळे त्यानं रागात तेजस्वीला तुझ्या मर्यादेत राहा नाही तर मी तुला या शोमधून बाहेर काढून टाकेन अशी धमकी दिली.
अंकितानं शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा रोमँटिक PHOTO, चाहत्यांना झाली सुशांतची आठवण
रोहित शेट्टी तिला म्हणाला, मी या ठिकाणी कोणत्याही शॉर्टकटमुळे पोहोचलेलो नाही. आज मी ज्या ठिकाणी आहे तिथे पोहोचण्यासाठी मला प्रचंड मेहनत करावी लागली आहे. तेजस्वी तू आता तुझ्या मर्यादेत राहा नाही तर या शोमधून बाहेर जावं लागेल. त्यानंतर या दोघांमध्ये काय होतं हे तर येत्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे.
एक कॉल आणि अकाउंटमधून पैसे गायब, KYC च्या नावाखाली अभिनेत्रीची फसवणूक
'खतरों के खिलाडी'च्या या 10 व्या सीझनचं शूटिंग बल्गेरियामध्ये झालं आहे. यंदाच्या या सीझनमध्ये करिश्मा तन्ना, धर्मेश येलांडे, करण पटेल, आरजे मलिष्का, अदा खान, शिवीन नारंग, बलराज स्याल, तेजस्वी प्रकाश आणि अमृता खानविलकर हे सहभागी झाले आहेत. मराठी सिनेसृष्टीतून या शोमध्ये जाणारी अमृता ही पहिलीच अभिनेत्री आहे.
हॉलीवूडमध्ये पोहोचला कोरोना, बडा अभिनेता आणि त्यांच्या बायकोची टेस्ट पॉझिटिव्ह
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rohit Shetty