मुंबई, 26 डिसेंबर : कन्नड चित्रपट 'KGF' (KGF) च्या दोन्ही भागांनी थिएटरमध्ये बंपर कमाई केली. यशचा चित्रपट 'KGF 1' जो 2018 साली आला होता, त्याचा सिक्वेल 'KGF Chapter 2' या वर्षी रिलीज झाला, ज्याने बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी केली. यशने रॉकी भाई बनून प्रेक्षकांची मने जिंकली होती. या चित्रपटाचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. यामध्ये यशच्या रॉकी भाईचे पात्र खूप प्रसिद्ध झाले. त्याची गँगस्टर शैली अप्रतिम आहे. यशचे डार्क कॅरेक्टर लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. पण अनेकवेळा असे घडते की अभिनेत्यांच्या पात्राचा त्यांच्या खऱ्या आयुष्यावरही वाईट परिणाम होतो. अशाच एका घटनेबाबत अभिनेता यशने खुलासा केला आहे.
गँगस्टरची भूमिका साकारल्यानंतर त्याच्या व्यक्तिमत्त्वात काय बदल झाले हे यशने सांगितले. KGF स्टार यशने एका मुलाखतीत त्याच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितलं. त्याने सांगितले की, 'जेव्हा आपण एखाद्याची व्यक्तिरेखा साकारतो तेव्हा आपल्याला त्याची विचारसरणी आणि वागणूक समजू लागते. कधी कधी त्याची वागणूक खऱ्या आयुष्यातही येते तर कधी तो वाईट गोष्टीही करतो.
हेही वाचा - आपल्या सिद्धूचं कौतुक करताना थकेना रणवीर सिंग; म्हणाला, त्याच्या इतका टॅलेंटेड अभिनेता...
त्या घटनेचाही अभिनेत्याने उल्लेख केला. तुम्हा सर्वांना 'KGF' चित्रपटातील तो सीन आठवत असेल ज्यात रॉकी भाई ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या एका महिलेच्या एका मुलाला तिच्या मांडीवर घेऊन रस्त्यावर पडलेली भाकरी उचलायला मदत करतो. यादरम्यान, 'आई ही जगातील सर्वात मोठी योद्धा आहे' असा त्यांचा आयकॉनिक डायलॉगही तो उच्चारतो. खऱ्या आयुष्याशी संबंधित अशीच एक घटना अभिनेत्याने शेअर केली होती.
View this post on Instagram
ही गोष्ट 'राजधानी' चित्रपटादरम्यान होती. हा त्याचा पहिला गँगस्टर चित्रपट होता. यामध्ये तो प्रत्येक गोळीबारात मागून बंदूक काढून लोकांना धमकावू लागतो. एके दिवशी त्याने हा सीन खऱ्या अर्थाने केला. तो मागून बंदूक काढतो. तेही धमकीवजा पद्धतीने. मात्र, ते काय करत आहेत, हे नंतर लक्षात येते. यश म्हणतो की, प्रत्येक पात्राचा अभिनेत्यावर काही ना काही प्रभाव पडत असतो.
यासोबतच अभिनेता यश याने कर्नाटकातील लोकांना बॉलिवूडचा अपमान करू नका असे आवाहन केले आहे. कर्नाटक चित्रपटसृष्टीही अशाच समस्यांमधून गेली असल्याचं यश म्हणाला. प्रसारमाध्यमांशी बोलताना यशने लोकांना आवाहन केले की, आपण उत्तर आणि दक्षिणेची तुलना करणे थांबवावं. यशची प्रतिक्रिया सध्या चांगलीच व्हायरल होत असून त्याच्या वक्तव्याविषयी त्याचं कौतुकही केलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, South indian actor