मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

कॅन्सरशी झुंज देताहेत KGF फेम हरीश रॉय; उपचारासाठीही नाहीय पैसा

कॅन्सरशी झुंज देताहेत KGF फेम हरीश रॉय; उपचारासाठीही नाहीय पैसा

'केजीएफ' या साऊथ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाच्या दोन्ही भागाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं.  चित्रपटातील मुख्य कलाकारांपासून ते सहाय्यक कलाकारांपर्यंत सर्वांनाच प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 27 ऑगस्ट-   'केजीएफ' या साऊथ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाच्या दोन्ही भागाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. फक्त देशातच नव्हे तर जगभरात हा चित्रपट तुफान लोकप्रिय ठरला आहे. चित्रपटातील मुख्य कलाकारांपासून ते सहाय्यक कलाकारांपर्यंत सर्वांनाच प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. त्यातीलच एक नाव म्हणजे 'कासिम चाचा' अर्थातच ज्येष्ठ कन्नड अभिनेता हरीश रॉय होय. हरीश रॉय सध्या प्रचंड कठीण काळातून जात आहेत. या ज्येष्ठ अभिनेत्याला कॅन्सरसारख्या आजारानं ग्रासलं आहे.

साऊथ अभिनेता हरीश रॉय यांची प्रकृती सध्या बरीच खालावली आहे. सध्या ते घशाच्या कॅन्सरने पीडित आहेत. हरीश रॉय हे कॅन्सरच्या चौथ्या टप्प्यावर आहेत. नुकतंच अभिनेत्याने एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं कि, ते गेल्या तीन वर्षांपासून या आजाराशी संघर्ष करत आहेत. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानसुद्धा ते या आजाराशी लढा देत होते.

एका मुलाखतीदरम्यान बोलताना हरीश रॉय यांनी सांगितलं की, 'सुरुवातीला त्यांना थॉयरॉईडचा त्रास होता. या आजाराने नंतर कॅन्सरसारख्या भयानक आजाराचं रुप घेतलं. ते गेल्या तीन वर्षांपासून कॅन्सरचा सामना करत आहेत. यावेळी अभिनेत्यानं उपचारासाठीसुद्धा आपल्याकडे पैसा नसल्याचं सांगितलं. इतकंच नव्हे तर आपल्या हातातील काही प्रोजेक्ट्स निघून जातील या भीतीने त्यांनी आपल्याला कॅन्सर असल्याचं सुरुवातीला लपवून ठेवलं होतं. त्यांच्याजवळ उपचारासाठी पुरेसा पैसा नसल्याने त्यांनी कॅन्सरची शस्त्रक्रियासुद्धा टाळली, आणि ते केजीएफ चॅप्टर २ च्या रिलीजची प्रतीक्षा करत होते. सध्या ते कॅन्सरच्या चौथ्या टप्प्यावर आहेत. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत आहे.

(हे वाचा:Sidhu Moosewala: सिद्धू मुसेवालाच्या वडिलांची पोलिसांत धाव; इंडस्ट्रीतील 2 लोकांविरुद्ध तक्रार दाखल )

हरीश रॉय यांनी गोपी गौडरू या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आपल्या आजाराचा खुलासा केला आहे. यावेळी बोलतांना त्यांनी सांगितलं, 'काही गोष्टी आपल्याला महानता बहाल करु शकतात किंवा एखाद्या गोष्टीपासून दूरही घेऊन जाऊ शकतात. जगण्याचं भाग्य नाहीय. गेल्या तीन वर्षांपासून कॅन्सरशी लढा देत आहे. केजीएफ २ च्या शूटिंगदरम्यान मोठी दाढी ठेवण्याचं एक कारण असं होतं की, कॅन्सरमुळे माझ्या चेहऱ्यावर सतत सूज येत आहे. ती सूज लपवण्यासाठी मी दाढीचा आधार घेतला. सोबतच त्यांनी सांगितलं चाहते आणि सहकलारांकडे मदतीचं आवाहन करण्यासाठी एक व्हिडीओसुद्धा रेकॉर्ड केला होता. पण तो करण्याचं धाडस नाही झालं'. कामाबाबत सांगायचं तर ते गेल्या 25 वर्षांपासून कन्नड सिनेसृष्टीत कार्यरत आहेत.

First published:

Tags: Cancer, Entertainment, South indian actor