मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /KGF 3: अखेर प्रतीक्षा संपली! पुन्हा दिसणार रॉकी भाईचा जलवा; समोर आली रिलीजबाबत मोठी अपडेट

KGF 3: अखेर प्रतीक्षा संपली! पुन्हा दिसणार रॉकी भाईचा जलवा; समोर आली रिलीजबाबत मोठी अपडेट

KGF

KGF

साऊथ सुपरस्टार यशच्या 'केजीएफ' या चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलच प्रभावित केलं आहे. या चित्रपटाचे आत्तापर्यन्त दोन भाग प्रदर्शित झाले आहेत. या दोन्ही चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रटाच्या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. फक्त देशातच नव्हे तर परदेशातसुद्धा या चित्रपटाने कोट्यवधींचा गल्ला जमवला आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 8 जानेवारी-   साऊथ सुपरस्टार यशच्या 'केजीएफ' या चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलच प्रभावित केलं आहे. या चित्रपटाचे आत्तापर्यन्त दोन भाग प्रदर्शित झाले आहेत. या दोन्ही चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रटाच्या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. फक्त देशातच नव्हे तर परदेशातसुद्धा या चित्रपटाने कोट्यवधींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटामुळे अभिनेता प्रभासचा जगभरात मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. आता यशच्या चाहत्यांना केजीएफच्या तिसऱ्या भागाची उत्सुकता लागून आहे. चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

साऊथ स्टार यशचे चाहते त्याच्या 'केजीएफ' या थ्रिलर चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. दोन भागांच्या अंगावर शहारा आणणाऱ्या अनुभवानंतर चाहत्यांना आता तिसरा भाग नेमका काय असणार? हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. दरम्यान यशच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. केजीएफचे निर्माते, होम्बाळे निर्मिती संस्थेकडून या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबाबत मोठ संकेत देण्यात आल आहे. रिपोर्ट्सनुसार, केजीएफ -3, 2025  मध्ये शूटिंगला सुरुवात होणार आहे. आहे. या चित्रपटाचे निर्माते प्रशांत नील सध्या प्रभासच्या 'सालार' मध्ये व्यग्र आहेत. त्यामुळे केजीएफच्या तिसऱ्या भागासाठी प्रेक्षकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

(हे वाचा:Siddhivinayak Temple: लेकीसोबत काजोल सिद्धिविनायकाच्या चरणी;मायलेकीनीं घेतला बाप्पाचा आशीर्वाद )

केजीएफमधील रॉकी भाईचा तुफानी अंदाज पाहून प्रेक्षक घायाळ झाले होते. रॉकी अर्थातच यशचा अभिनय आणि चित्रपटाचं कथानक प्रेक्षकांना भुरळ घालून गेलं होतं. पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत सर्वांनाच वेड लावलं होतं. पहिल्या भागाच्या यशानंतर दुसरा भाग भेटीला आला होता. पहिल्या भागाप्रमाणेच या चित्रपटाच्या दुसऱ्या भागालासुद्धा प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. या भागानेसुद्धा कोट्यावधींचा गल्ला जमवला आहे. याच भागाच्या शेवटी निर्मात्यांनी चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची हिंट दिली होती. तेव्हापासूनच चाहते तिसऱ्या भागाबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

दरम्यान अशीही चर्चा अशीही चर्चा सुरु आहे की, केजीएफ 3 मध्ये यशला रिप्लेस केलं जाणार आहे. कारण यश सध्या आपल्या इतर प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहे. परंतु याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु यशच्या चाहत्यांना यशच्या चाहत्यांना तोच हा भूमिका साकारेल याची खात्री आहे. 2025 मध्ये शूटिंगला सुरुवात होणार आहे.

तसेच आगामी काळात यश काही बिग बजेट प्रोजेक्ट्ससोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात आहे. महाभारतावर आधारित चित्रपटात यशला कर्णाची भूमिका ऑफर करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. या रिपोर्ट्सवर विश्वास ठेवल्यास यश लवकरच बॉलिवूडमध्येही दिसून शकतो.

First published:

Tags: Entertainment, Lokmat news 18, South indian actor