KGF Chapter 2- यशचा सिनेमातील लुक लीक, सोशल मीडियावर याचीच चर्चा जास्त

KGF Chapter 2- यशचा सिनेमातील लुक लीक, सोशल मीडियावर याचीच चर्चा जास्त

पहिल्या भागाची लोकप्रियता पाहून निर्मात्यांनी याच सिनेमाचा दुसरा भाग तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. केजीएफ चॅप्टर २ असं या सिनेमाचं नाव असणार आहे.

  • Share this:

मुंबई, 13 मे- दाक्षिणात्य सुपरस्टार यशला कोण ओळखत नाही असं तर होऊच शकत नाही. कट्टर बॉलिवूडकरही त्याचे चाहते आहेत. या सिनेमाने बॉक्स ऑफिसचे अनेक रेकॉर्ड मोडले होते. विशेष म्हणजे या सिनेमातील यशच्या अभिनयाचे अनेकांनी भरभरून कौतुक केलं होतं. पहिल्या भागाची लोकप्रियता पाहून निर्मात्यांनी याच सिनेमाचा दुसरा भाग तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. केजीएफ चॅप्टर २ असं या सिनेमाचं नाव असणार आहे. सध्या सिनेमाच्या सेटवरील अनेक फोटो व्हायरल होत आहेत.

सनी लिओनीने 'या' एका अटीवर साइन केलेले सहा पॉर्न सिनेमे

असं म्हटलं जातं की, केजीएफच्या दुसऱ्या चॅप्टरमध्ये संजय दत्तचीही महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. संजय या सिनेमात नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. पण याबद्दल निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. एका मुलाखतीत यशनेच सांगितलं होतं की, ‘केजीएफ सिनेमासाठी संजय दत्तला विचारण्यात आलं होतं. मात्र तारखा जुळत नसल्यामुळे त्याने नकार दिला. पण आता चॅप्टर २ साठीही त्याला विचारण्यात आले आहे.’

Kabir Singh Trailer- 'तेरे लिए कुछ भी कर सकता हूं... तेरे में मेरे जैसा पागलपन है तो...'

केजीएफ चॅप्टर १ सिनेमा गेल्या वर्षी २१ डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा हिंदी, कन्नड, तेलगु, तमिळ आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता. ८० कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या सिनेमाने दुप्पटीहून अधिक कमाई केली होती.

‘ती अजूनही माझ्या कवेत आहेत,’ विवेकच्या या वक्तव्यानंतर सलमानने दिली होती ‘ही’ धमकी

प्रशांत नील यांनी या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं. यशशिवाय या सिनेमात श्रीनिधी शेट्टी आणि रामचंद्र राजू यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

अचानक एक्स बॉयफ्रेंडला समोर पाहून सारा अली खानने फिरवला चेहरा

VIDEO: केरळमध्ये पौर्णिमेची धमाल, हत्तीच्या सोंडेनं उघडलं दक्षिणेचं दार

First published: May 13, 2019, 2:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading