मुंबई, 07 डिसेंबर : अभिनेता यशचा सुपरहिट केजीएफ सिनेमातील तो वृद्ध व्यक्ती तुम्हाला आठवत असेल. सिनेमात रॉकीच्या आयुष्यात आलेल्या महत्त्वाच्या क्षणी त्याची कान उघडणी करण्यासाठी त्या वृद्ध व्यक्तीनं महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्या वृद्ध व्यक्तीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचं दु:ख निधन झालं आहे. केजीएफ मधील अभिनेते कृष्णा जी राव यांचं निधन झालं आहे. यांची प्रकृती काही दिवसांआधी खालावल्याची माहिती समोर आली होती. मात्र उपचारांती त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. कृष्णा जी राव यांचं वयाच्या 70व्या वर्षी निधन झालं. केजीएफमुळे कृष्णा जी राव प्रसिद्ध झाले होते. सिनेमात त्यांनी रॉकीला मार्गदर्शन करणारा महत्त्वाचा रोल केला होता. कृष्णा जी राव यांना वयोमानानं मागचे काही दिवस त्रास होत होता. त्यांना बंगळूरूच्या सीता सर्कल जवळील विनायक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातच उपचारांती त्यांचा मृत्यू झाला.
कृष्णा जी राव यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा जी यांना थकवा आला होता. त्यांचं जेवण पाणी कमी झालं होतं. त्यांनी शरिर टाकून दिल्यानं त्यांना मध्यरात्री जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारांसाठी त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं.
हेही वाचा - Hina Khan : हिना खानला प्रेमात मिळाला धोका; तब्बल 13 वर्षांनंतर नात्यात दुरावा
2018मध्ये रिलीज झालेल्या केजीएफ चॅप्टर 1 नंतर कृष्णा जी राव यांनी जवळपास 30 सिनेमांमध्ये काम केलं. केजीएफनंतर दुसऱ्या आठवड्यातच त्यांनी जवळपास 15 सिनेमे साइन केले. त्यांची क्रेझ प्रचंड वाढली होती. वयाच्या70व्या वर्षी देखील त्यांचा उत्साह दांडगा होता. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, प्रशांत नील यांनी त्यांना एक दिवशी ऑडिशनला बोलावलं. माझ्या कामावर ते खूप इंम्रेस झाले. त्यांनी लगेच मला केजीएफ सिनेमा ऑफर केला.
केजीएफमध्ये कृष्णा जी राव यांची भूमिका छोटी असली तरी महत्त्वपूर्ण होती. सिनेमात रॉकीच्या आयुष्यात आलेल्या महत्त्वाच्या क्षणी त्याची कान उघडणी करण्यासाठी कृष्णा जी रावची खास एंट्री झाली होती. सिनेमात त्यांनी आंधळ्या म्हाताऱ्याची भूमिका साकारली होती. रॉकीमध्ये असलेल्या चांगल्या माणसाची त्याला ओळख करून देण्यात कृष्णा जी राव यांची सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका ठरली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.