मुंबई, 25 जानेवारी- मराठी सिनेसृष्टीमध्ये सध्या एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमे पाहायला मिळत आहेत. चित्रपटांमध्ये हाताळत असलेले विविध विषय प्रेक्षकांना प्रचंड भुरळ घालत आहेत. तर अनेकांना काही गाजलेल्या सिनेमांचा सिक्वेल पाहण्याची इच्छा आहे. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे 'शाळा' होय. शाळा या चित्रपटाने तुफान लोकप्रियता मिळवली होती. या चित्रपटाच्या कथेने प्रेक्षकांना आकर्षित करुन घेतलं होतं. प्रेक्षकांना अनेक वर्षापासून या चित्रपटाचा दुसरा भाग पाहण्याची इच्छा होती. आता लवकरच प्रेक्षकांची ही इच्छा पूर्ण होणार असल्याच दिसून येत आहे.
सध्या अनेक चित्रपटांचे सिक्वेल भेटीला येत आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांचं भरभरुन प्रेमसुद्धा मिळत आहे. काही दिवसांपूर्वी हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा 2'ची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे चाहते प्रचंड उत्सुक आहेत. आता आणखी एका मराठी चित्रपटाचा दुसरा भाग भेटीला येणार असल्याची मोठी हिंट मिळाली आहे. हा चित्रपट दुसरा कोणता नसून 'शाळा' आहे. शाळा या मराठी चित्रपटाने अफाट लोकप्रियता मिळवली होती. शिवाय अनेक पुरस्कारदेखील पटकावले होते.
(हे वाचा: Pathaan: रितेश देशमुखलाही 'पठाण'चं वेड; शाहरुखच्या सिनेमासाठी केलेलं ते ट्विट चर्चेत)
2012 मध्ये शाळा हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुजय डहाके यांनी केलं होतं. तर चित्रपटाची कथा मिलिंद बोकील यांनी लिहली होती. या चित्रपटात अंशुमन जोशी, अभिनेत्री केतकी माटेगावकर मुख्य भूमिकेत होते. तर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, संतोष जुवेकर, अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी, अश्विनी गिरी हे प्रतिभावान कलाकार महत्वाच्या भूमिकेत झळकले होते. या चित्रपटाची प्रचंड चर्चा झाली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.
View this post on Instagram
गेल्या अनेक वर्षापासून या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षकांना प्रतीक्षा लागून होती. मात्र आता ही प्रतीक्षा लवकरच संपणार असल्याचं दिसून येत आहे. अभिनेत्री केतकी माटेगावकरने याबाबत एक मोठी हिंट दिली आहे. पर्पल मराठीने शेअर केलेल्या एका पोस्टनुसार केतकी माटेगावकरने हिंट देत लिहलंय, शिरोडकर लवकरच पुन्हा येत आहे....' शाळा या चित्रपटात केतकी माटेगावकरने शिरोडकर आडनाव असणाऱ्या एका मुलीची भूमिका साकारली होती. त्यामुळे केतकीच्या या कमेंटमधून 'शाळा 2' लवकरच येणार असल्याची चाहूल लागली आहे.
केतकी माटेगावकर मराठीतील एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. केतकी एक उत्तम गायिकासुद्धा आहे. केतकी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अभिनेत्री सतत आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना आपल्या दैनंदिन अपडेट्स देत असते. चाहतेसुद्धा अभिनेत्रींच्या प्रत्येक पोस्टवर भरभरून प्रेम करत असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.