मुंबई, 22 मार्च : अभिनेत्री केतकी चितळे नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आपली मतं ती बिनधास्तपणे मांडत असते. तिच्या याच बिनधास्तपणामुळे अनेकदा ती अडचणीत देखील सापडली आहे. मागील वर्षी एका वादग्रस्त पोस्टमुळे केतकी चर्चेत आली होतं. तिच्या फेसबुक अकाउंटचे एक्सेस तिच्याकडून काढून घेण्यात आले होते. दरम्यान आता केतकीला तिचं फेबसुक एक्सेस परत मिळाल्यानंतर ती पुन्हा अँक्टिव्ह झाली. आज सर्वत्र गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळतोय. सगळेच जण आपापल्या पद्धतीनं मराठी नुतन वर्षाचं स्वागत आहे. केतकीनं देखील गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात. शुभेच्छा देत केतकीनं थेट पुणेकरांचेच कान पिळले आहेत.
केतकीनं चितळे नेहमीच व्हिडीओ शेअर करत तिचं मतं मांडत असते. गुढीपाडव्याच्या निमित्तानं केतकी थेट पुण्यात पोहोचली. पुण्यात देखील गुढीपाडव्याचा उत्साह सुरू आहे. मात्र पुण्यात जाताच केतकीला काही गोष्टी खटकल्या आणि तिनं थेट व्हिडीओ करत पुणेकरांचे आणि विशेषत: तिला ट्रोल करणाऱ्या स्व:घोषित मावळ्यांचे चांगलेच कान पिळलेत.
हेही वाचा - Gudi Padwa 2023: एकमेकांच्या साथीने केली नववर्षाची सुरुवात;असा होता अक्षया-हार्दिकचा लग्नानंतर पहिला पाडवा
View this post on Instagram
केतकीनं व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती म्हणतेय, "मी केतकी चितेळे. मी पुण्यात आहे. म्हणजेच स्व: घोषित मावळ्यांच्या जन्मभूमीत. असं म्हणता येईल? म्हणूच शकतो आपण याला. रस्त्यावरून जाताना "हॅप्पी गुढीपाडवा" असं लिहिलेले अनेक बॅनर्स आणि पोस्टर्स दिसले. या स्वघोषित मावळ्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की, आता तुम्ही विसरता का महाराजांना, त्यांच्या शिकवणींना विसरता का? केवळ दादागिरी करताना महाजांचं नाव वापरून तुम्ही एकप्रकारे त्यांचा अपमान करायला तयार आहात. पण नवीन वर्षाला "हॅप्पी गुढीपाडवा" म्हणायला तुम्हाला काहीही वाटत नाही. असो, तुम्हा सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षांच्या हार्दीक शुभेच्छा. जय हिंद. वंदे मातरम्. भारत माता की जय!"
मागील वर्षीच केतकीनं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या फेसबुक पोस्टमुळे चर्चेत आली होती. या प्रकरणामुळे केतकी 40 दिवस कोठडी सुनावण्यात आली होती. या प्रकरणानंतर केतकीवर प्रचंड टीका करण्यात आली. त्याचप्रमाणे केतकीनं देखील अनेक जणांवर गंभीर आरोप देखील केले. तिचं फेसबुक अकाऊंट काही दिवसांसाठी रिस्ट्रीक्ट करण्यात आलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.