Home /News /entertainment /

केतकी चितळेनं मोबाईलमधून तो मेसेज का केला डिलीट? पोलिसांच्या तपासाला नवे वळण

केतकी चितळेनं मोबाईलमधून तो मेसेज का केला डिलीट? पोलिसांच्या तपासाला नवे वळण

केतकी चितळेने मोबाईलमधील SMS डीलीट केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे केतकी चितळेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    मुंबई, 18 मे - मागच्या काही दिवासांपासून सोशल मीडियावर केतकी चितळे ( Ketaki Chitale Case ) हे नाव चांगलच चर्चेत आलं आहे. शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणं तिला चांगल महागात पडलं आहे. या प्रकरणी दिवसेंदिवस तिच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. आता या प्रकरणात एक नवीन माहिती समोर  ( Ketki Chitale Case Update )आली आहे. केतकी चितळेने मोबाईलमधील SMS डीलीट केले असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय शरद पवार यांच्याविषयी फेसबुक पोस्ट केतकीला कुणीतरी पाठवली असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. 2020 सालची पोस्ट अचानक कशी सापडली, असा प्रश्न देखील पोलिसांनी उपस्थित केला आहे. केतकी व्हॉट्सअॅपचा वापर करत नसून फक्त फेसबुक आणि SMS च्या माध्यमातून सक्रिय असल्याचं पोलिसात तपासात स्पष्ट झालंय. दरम्यान केतकी चितळेचा मोबाईल आता फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवला जाणार आहे.  केतकी चितळेने फेसबुकवर पोस्ट टाकली त्याबद्दल सायबर सेलच्या मदतीने तपास केला जात आहे. वाचा-'बालगंधर्वच्या प्रयोगानंतर युरीन इन्फेक्शन घेऊन घरी येते' विशाखा सुभेदारची पोस्ट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar)  यांच्याबाबत फेसबुक पोस्ट प्रकरणी वादग्रस्त अभिनेत्री केतकी चितळेच्या (Ketaki Chitale) अडचणीत वाढ झाली आहे. केतकीच्या जामीन अर्जाचा निर्णय राखीव ठेवला आहे. जामीन अर्जावर सुनावणी अपूर्ण राहिली आहे. त्यामुळे  केतकीला आता ठाण्यातील कारागृहात हलवण्यात आले आहे. वाचा-मीनाक्षीची ऑनस्क्रीन जाऊबाईसाठी जोरात पोस्ट, माधवी निमकरसोबत केला खास फोटो शेअर केतकीची पोस्ट नेमकी काय आहे ? अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत लिहिलं आहे. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट असल्याचंही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. केतकीने 'तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक.. अशी कविता पोस्ट केली होती.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Entertainment, Marathi entertainment

    पुढील बातम्या