मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Kesariya Song Out:आलिया-रणबीरची केमिस्ट्री ठरतेय सुपरहिट; एका तासात गाण्याला मिळाले इतके मिलियन व्ह्यूज

Kesariya Song Out:आलिया-रणबीरची केमिस्ट्री ठरतेय सुपरहिट; एका तासात गाण्याला मिळाले इतके मिलियन व्ह्यूज

बॉलिवूडमधील लव्हबर्ड्स रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा बहुप्रतिक्षित 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटातील 'केसरिया' हे पहिलं गाणं नुकतंच लाँच करण्यात आलं आहे.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 17 जुलै-   बॉलिवूडमधील लव्हबर्ड्स रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा बहुप्रतिक्षित 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटातील 'केसरिया' हे पहिलं गाणं नुकतंच लाँच करण्यात आलं आहे. या गाण्यात आलिया आणि रणबीरमध्ये उत्तम बाँडिंग पाहायला मिळत आहे. गाण्यात दोघेही रोमँटिक क्षण शेअर करताना दिसत आहेत. गाण्यात आलिया आणि रणबीर वाराणसीच्या रस्त्यांवर एकमेकांच्या डोळ्यांत हरवून गेलेले दिसत आहेत. तरुणाईंच्या गळ्यातील ताईत असलेल्या अरिजित सिंहने 'ब्रह्मास्त्र'मधील 'केसरिया हे गाणं नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर पद्धतीने गायिलं आहे. लोकप्रिय संगीतकार प्रीतम यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे. हे गाणं प्रसिद्ध गीतकार अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिलं आहे.या गाण्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. काही मिनिटांतच या गाण्याला यूट्यूबवर १ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. (हे वाचा:Shilpa Shetty: आलिशान फ्लॅटपेक्षा कमी नाहीय शिल्पाची नवी Vanity Van; समोर आला Inside Video ) रणबीर कपूर आणि आलिया भट्टचं हे गाणं अवघ्या 2 मिनिट 52 सेकंदाचं आहे. यामध्ये ईशा आणि शिवाची जबरदस्त लव्हस्टोरी दिसून येत आहे. हे दोघेही वाराणसीच्या आध्यात्मिक ठिकाणी एकमेकांवरील प्रेमाची कबुली देतात. गाण्याची क्लिप शेअर करत आलिया भट्टने लिहिले की, “आमच्या प्रेमाचा आवाज आता तुमचा आहे. केसरीया आता रिलीज झाला आहे. आलियाच्या या पोस्टलासुद्धा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.
First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood News, Entertainment, Ranbir kapoor

पुढील बातम्या